Vivo V40 Series Launched : Vivo V40 सिरीज भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Vivo V40 Series Launched । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात Vivo V40 सिरीज लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने Vivo V40 Pro आणि Vivo V40 असे २ मोबाईल बाजारात आणले आहेत. स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5500mAh आणि 12GB RAM यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने हा हँडसेट आणि टायटॅनियम ग्रे रंगात लाँच केला असून येत्या 13 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. आज आपण या मोबाईलचे खास स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात..

   

Vivo V40 आणि Vivo V40 या दोन्ही मोबाईल मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 4500 Nits पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. Vivo V40 Pro मध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर बसवण्यात आला आहे तर Vivo V40 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही स्मार्टफोन्स Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर काम करतात.

कॅमेरा – Vivo V40 Series Launched

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo V40 मध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 50MP वाइड अँगल कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. Vivo V40 Pro मध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला 50MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईलच्या बॅटरी बाबत बोलायचं झाल्यास, दोन्ही मोबाईल मध्ये 5500mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 80W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. Vivo V40 Series Launched

किंमत किती?

Vivo V40 Pro च्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. तर 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 55,999 रुपये आहे. हा फोन निळा आणि टायटॅनियम ग्रे रंगात येतो. तर दुसरीकडे Vivo V40 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे, याशिवाय 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 41,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लू, लोटस पर्पल आणि टायटॅनियम ग्रे रंगात येतो.