BSNL Recharge Plan : 105 दिवसांची व्हॅलिडिटी, 2GB इंटरनेट; BSNL चा रिचार्ज प्लॅन बाजारात घालतोय धुमाकूळ

BSNL Recharge Plan । एअरटेल- जिओ सारख्या देशातील टॉपच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती महाग झाल्यानंतर सर्वसामान्य ग्राहक BSNL या देशी कंपनीकडे वळला आहे. बीएसएनएनलचे रिचार्ज अतिशय स्वस्त किंमत आणि खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने मागील महिन्यापासून ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात BSNL कार्ड खरेदी करत आहे. कंपनीच्या लिस्ट मध्ये अनेक स्वस्तात मस्त रिचार्ज उपलब्ध आहेत. तुम्ही जर बीएसएनएलचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एक रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्याची व्हॅलिडिटी तब्बल १०५ दिवसांची आहे. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यानंतर साडेतीन महिने रिचार्जच कोणतेही टेन्शन नाही. चला तर आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

   

बीएसएनएलचा 666 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन- BSNL Recharge Plan

आज आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत तो आहे बीएसएनएलचा 666 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन…. या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना दररोज 2GB हाय स्पीड इंटरनेट डेटा वापरता येतोय. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ची सुविधा उपलब्ध आहे. जर एखाद्याला दुसऱ्या प्लॅनमध्ये शिफ्ट करायचे असेल तर हे फक्त प्लॅन व्हाउचरने करता येते. बीएसएनएलचा हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो ज्यांना जास्त व्हॅलिडिटी आणि इंटरनेटचा लाभ घ्यायचा आहे. बीएसएनएल कडे असे अनेक आणि भरपूर रिचार्ज प्लॅन आहेत. (BSNL Recharge Plan)

दरम्यान, मागच्या महिन्यापासून BSNL च्या सिमकार्डची मागणी प्रचंड वाढली आहे, एअरटेल- जिओचे रिचार्ज महाग झाल्याने ग्राहकांचा बीएसएनएलवर विश्वास वाढला आहे. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी कंपनी सुद्धा पुढे सरसावली आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL कडून देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवले जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती. तर मार्च 2025 पर्यंत आणखी हजार टॉवर बसवले जातील असं त्यांनी म्हंटल होते. म्हणजेच एकूण 1 लाख BSNL टॉवर देशात उभारले जातील. सध्या जरी BSNL 4G सेवा देत असली तरी कंपनी 5G इंटरनेटवर सुद्धा काम करत आहे. बीएसएनएलचे नवीन 5G सिमकार्डची झलक सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे येत्या काळात Jio-Airtel ला टक्कर देत BSNL जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे.