Aliens बाबत ISRO प्रमुख सोमनाथ यांचं खळबळजनक विधान; पहा नेमकं काय म्हणाले?

टाइम्स मराठी : Aliens म्हणजेच परग्रहवासींबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. या संपूर्ण ब्रह्मांडात कुठे तरी एलिअन्स असतील असा दावा आत्तापर्यंत अनेक संशोधकांनी केला आहे. मात्र त्याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. पृथ्वीवर अनेकदा UFO सुद्धा हवेत उडताना दिसले, मात्र त्याबाबतची सुद्धा स्पष्टता कधीच समोर आली नाही. मात्र आता ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी Aliens बाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. सोमनाथ यांनी एलिअन्सचे अस्तित्व मान्य केलं आहे, तसेच ते आपल्यापेक्षा जास्त फॉरवर्ड असू शकतात असेही म्हंटल आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाशी बोलताना सोमनाथ यांनी आपलं मत मांडलं आहे.

   

एस सोमनाथ म्हणाले, एलियन्स नेहमीच आकर्षक राहिले आहेत ‘ज्यांना आपण एलियन म्हणतो ते बुद्धिमान प्राणी आहेत. ‘एलियन्स कदाचित तुमचे पॉडकास्ट सध्या ऐकत असतील. मी नेहमी मानतो की आपल्या आजूबाजूला एलियन्स आहेत जे खूप विकसित आहेत. मात्र कधी कधी हे एलियन्स आपल्यापेक्षा जास्त हुशार असू शकतात किंवा आपल्यासारखे हुशार सुद्धा नसतील. एलियन्स हे आपल्यापेक्षा १००० वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असण्याची सुद्धा शक्यता आहे. ते आपल्या समजण्याच्या पलीकडे असलेल्या विश्वाचे निरीक्षण करत असतील किंवा त्याच्याशी संवाद साधत असतील. मला कधीही एलियन्सच्या संपर्कात न आल्याने आनंद होईल असं एस सोमनाथ यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हार्वर्ड विद्यापीठात एलियन्सशी संबंधित एक अहवाल सादर करण्यात आला होता. एलियन्स माणसांमध्ये छुप्या पद्धतीने राहत असल्याचे सदर अहवालात म्हटले होते. याशिवाय, एलिअन्स बुद्धिमान गट किंवा संघटना आहेत, ज्यांनी स्वतःला लपवून ठेवले आहे, असेही सांगण्यात आले. या अहवालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.