Rashi Bhavishya : 18 सप्टेंबरचे चंद्रग्रहण ‘या’ 4 राशींसाठी धोकादायक; मोठं नुकसान होण्याची शक्यता

टाइम्स मराठी । या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण हे गणेशोत्सवनंतर म्हणजे गणेश चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृ पक्षाच्या पहिला दिवशी असणार आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ही एक खगोलशास्त्रीय घटना असली तरी ग्रहण हे हिंदू धर्मात शुभ मानलं जात नाही. ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये, शुभ कार्य करू नये असं म्हंटल जाते. ज्योतिषशास्त्रानुसार (Rashi Bhavishya) या चंद्रग्रहणाचा काही राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. या राशी नेमक्या कोणकोणत्या आहेत ते आज आपण सविस्तर जाणून घेऊयात…

   

मेष (Aries Zodiac)

मेष राशींच्या (Rashi Bhavishya) लोकांसाठी चंद्रग्रहण हे लाभदायी नाही. कारण चंद्रग्रहणाच्या दरम्यान मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीसोबतच्या नात्यात तणाव येण्याची शक्यता आहे. तसेच वाद- विवाद सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो सावधानतेने पाऊले टाका.

कर्क (Cancer Zodiac)– Rashi Bhavishya

कर्क राशीच्या व्यक्तींना चंद्रग्रहण धोकादायक आहे. तुम्ही जर कोणत्या ठिकाणी नोकरी करत असाल तर तुमची नोकरी जाऊ शकते. तुमच्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कितीही तणाव असला तरी विचारपूर्वक निर्णय घ्या.

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप वाईट काळ घेणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणीही विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे तिथे काळजी घेण्याची गरज आहे. शक्यतो जास्त कोणाशी बोलू नका, मनातील गोष्ट कोणाला शेअर करू नका. आपले कोण आणि परके कोण हे दाखवणारा हा काळ असेल.

मकर (Capricorn Zodiac)

चंद्रग्रहण मकर राशीच्या लोकांच्या जीवनात संकट आणू शकते. मकर राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. कुटुंबातील वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमची इमेज यामुळे डॅमेज होऊ शकते. त्यामुळे स्वतःहून कोणाला काय बोलू नका. वरिष्ठांचे ऐकण्यावर भर द्या.