टाइम्स मराठी । देशातील रुढी-परंपरांमध्ये महत्त्वाचा स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा १७ सप्टेंबरपासून सुरू झाला असून २ ऑक्टोबरला संपणार आहे. पितृपक्ष हा १५ दिवसांचा असतो. या काळात पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान विधी केले जातात. पितृ पक्षाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व (Pitru Paksha Astrology) देखील आहे ज्याचा आपल्या जीवनावर, करिअरवर आणि आर्थिक निर्णयांवर मोठा परिणाम होतो. या वर्षीच्या पितृ पक्षात काही राशींच्या लोकांना सांभाळून राहण्याची गरज आहे. नाहीतर तुम्हाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. या राशी कोणत्या आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
1) मेष-
मेष रशियाच्या व्यक्तींसाठी पुढचे १५ दिवस हे संकटाचे असू शकतात, मात्र तुम्ही नेहमीच आयुष्यात पुढे जाण्याचा विचार ठेवला पाहिजे. तुमच्या करिअर मध्ये भलेही अनेक अडथळे येत राहील मात्र त्यातूनच तुम्हाला मार्ग काढावा लागेल. पितृपक्षाच्या काळात आर्थिक संकट सुद्धा तुमची पाठ सोडणार नाही. (Pitru Paksha Astrology)
2) कर्क– Pitru Paksha Astrology
पितृपक्षाच्या काळात कर्क राशींच्या व्यक्तींना अनावश्यक खर्चाला सामोरे जाऊ लागू शकते.तुमच्या खर्चावर नियंत्रण राहणार नाही. पैसे एकीकडून येतील आणि दुसरीकडून जातील अशी परिस्थिती राहील. जर तुम्ही नोकरदार असाल तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस सावधगिरी बाळगा.
3) कन्या–
कन्या राशीच्या लोकांना सुद्धा पितृपक्षात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा, आर्थिक तंगीमुळे तुमची डोकेदुखी वाढेल. या काळात तुम्ही चूक नसतानाही तुमचा कोणाकडून अपमान होऊ शकतो. घरातील कौटुंबिक संबंध बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिभेवर ताबा ठेवा.
4) वृश्चिक–
पितृपक्षाच्या काळात वृश्चिक राशींच्या लोकांचा मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी समन्वय चांगला राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला वादालाही सामोरे जावं लागू शकते. त्यामुळे कोणाला काहीही बोलण्यापूर्वी विचार करा. पितृपक्षाच्या काळात तुम्हाला आर्थिक तंगीला सुद्धा सामोरे जाऊ लागेल. ज्याठिकाणी नोकरी करताय त्याठिकाणी वाद होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.