टाईम्स मराठी टीम । Royal Enfield हंटर 350 चा लूक सर्वांना प्रेमात पाडतो. ही बाईक कॉलेज तरुण असो किंवा ऑफिस बॉय या सर्वांच्या आवडीची आणि फॅशनेबल बाईक आहे. या बाईकची किंमत पूर्वी सर्वसाधारण घरातील व्यक्तीला परवडणारी होती. परंतु आजकालच्या तरुण पिढीला आवडणारी ही खास बाईक आता महाग होणार आहे. ही बाईक कंपनीने सर्वांना परवडेल अशा किंमतीत विकली होती. आणि त्याची किंमत देखील तशीच ठेवलेली होती जी सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल. परंतु आता चित्र पालटलंय. आता ही रॉयल लूक वाली बाईक महाग होणार आहे. (Royal Enfield Price)
कमी किंमतीत चांगला परफॉर्मन्स देणारी बाईक कंपनी Royal Enfield ही सर्वात लोकप्रिय बाईक कंपनी पैकी एक आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये या कंपनी ने कमी किंमतीत म्हणजेच परवडणाऱ्या किंमतीत ही रॉयल इनफिल्ड हंटर 350 बाईक लॉन्च केली होती. त्यावेळी या बाईक प्रेमींना त्यांच्या बजेटमध्ये चांगला अनुभव मिळाला होता. पण आता या कंपनीने बाईकची किंमत अजून वाढवली आहे.
रॉयल इनफिल्ड हंटर 350 या बाईकला दोन ट्रिम मध्ये ऑफर केले आहे. या बाईकचे एकूण तीन मॉडेल आहेत. या बाईकची किंमत 1 लाख 49 हजार एवढी होती. आता ती वाढून 1 लाख 75 हजार करण्यात आली आहे. अजून तरी या कंपनीने या बाईकच्या बेस व्हेरियंट ची किंमत वाढवलेली नसून बाकीच्या प्रकारांची किंमत वाढली आहे. रेट्रो हंटर फॅक्ट्री सिरीज ची आताची किंमत 1 लाख 49 हजार रुपये एवढी झाली आहे. तर मेट्रो हंटर डेपर सिरीज ची किंमत 1 लाख 69 हजार 656 एवढी तर मेट्रो हंटर रेबल सिरीज ची किंमत 1 लाख 74 हजार 655 एवढी वाढली आहे.