Ola S1 Air Delivery । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. परवडणाऱ्या किंमतीत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून डिझाईन आणि लूक यामुळे तरुणांना आकर्षक ठरते. त्यातच महत्त्वाचे म्हणजे आपला पेट्रोल- डिझेलचा खर्चही वाचतोय. भारतात Ola कंपनीच्या स्कुटरला ग्राहकांची मोठी मागणी पाहायला मिळत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपली Ola S1 Air ही सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली होती. मात्र अजूनही तिची डिलिव्हरी सुरु करण्यात आलेली नाही. परंतु आता या स्कुटरची डिलिव्हरी कधीपासून सुरु होईल हे कंपनीचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
डिलिव्हरी ऑगस्ट महिन्यात सुरू – Ola S1 Air Delivery
Ola S1 Air ही स्कूटर प्री ऑर्डर करण्यासाठी 28 जुलै पासून 30 जुलै पर्यंत ग्राहकांसाठी खुली करण्यात येणार आहे. आणि या स्कूटरची डिलिव्हरी (Ola S1 Air Delivery) ऑगस्ट महिन्यात सुरू होऊ शकते असं कंपनीने जाहीर केलं आहे. 1,09,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत या स्कुटरची डिलिव्हरी सुरु होईल. खरं तर Ola S1 Air ही स्कूटर लॉन्च करण्यात आली तेव्हा तिची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु 1 जून रोजी सबसिडी मध्ये कपात केल्यानंतर आता या स्कूटरची किंमत 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
काय आहेत Ola S1 Air चे फीचर्स –
Ola S1 Air या इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 99 kg एवढे असून LED हेडलॅम्प आणि टेललॅम्प, फ्लॅट फ्लोअरबोर्ड देण्यात आले आहे. या स्कूटर ला S1 आणि S1 प्रो पेक्षा वेगळी सीट देण्यात आली आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये सिंगल पीस ट्यूबलर ग्रॅब हँडल, TFT डिस्प्ले 7 इंच, यासह हिल होल्ड आणि प्रॉक्सीमिटी अलर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.
101 KM रेंज –
Ola S1 Air मध्ये 3 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 125 किलोमीटर पर्यंतची रेंज देऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. तसेच या स्कुटरचे टॉप ताशी 90 किलोमीटर असून ही इको, नॉर्मल, स्पोर्ट्स या तीन रायडिंग मोड मध्य चालवू शकता. ओला S1 एयर मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क, ट्विन रियर शॉक अब्जॉर्बर यासह फ्रंट और रियर ड्रम ब्रेक्स देखील देण्यात आले आहे.