टाइम्स मराठी । सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे अनेक जण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे पसंती दाखवत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये बाजारात आणल्या आहेत. परंतु जास्तीच्या खर्चामुळे अनेकांना इच्छा असूनही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणं शक्य नसते. परंतु जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक गाडी खरेदी करू इच्छित असाल पण पैशाची अडचणअसेल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक ऑफर सांगणार आहोत ज्यामाध्यमातून तुम्ही अवघ्या 10 हजार रुपयांत इलेक्ट्रिक स्कुटर घरी घेऊन जाऊ शकता.
आम्ही तुम्हाला ज्या इलेक्ट्रिक स्कुटर बद्दल सांगत आहोत तिचे नाव आहे Komaki LY Pro. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 1,37,500 लाख रुपये आहे. परंतु तुम्ही अवघ्या 10000 हजार रुपयांच्या डाउनपेमेंट वर ही स्कुटर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 9.7 टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी दर महिन्याला 2,888 रुपये हप्ता भरावा लागेल. तसेच डाउन पेमेंट आणि कालावधी बदलायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट द्यावी लागेल.
काय आहेत Komaki LY Pro चे फीचर्स – (Komaki LY Pro)
Komaki LY Pro या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 62V 32AH पॉवरच्या २ बॅटरी पॅक देण्यात आल्या आहे. दोन्ही बॅटरी चार्ज करण्यासाठी ५ तासांचा वेळ लागतो. यातील एक बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर Komaki LY Pro इलेक्ट्रिक स्कुटर 85 किलोमीटर पर्यंत धावू शकते. तसेच दोन्ही बॅटरी चार्ज केल्यास हि इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल १८० किलोमीटर पर्यंत रेंज देते. याशिवाय या इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड 62 किलोमीटर आहे. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी Komaki LY Pro मध्ये अँटी स्किड तंत्रज्ञान देण्यात आलं आहे.
Komaki LY Pro ला 12-इंचाचे ट्यूबलेस टायर मिळतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन गिअर मोड देण्यात आले आहेत. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये साउंड सिस्टम, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, टीएफटी डिस्प्ले आहे, ब्लूटूथ, कॉलिंग ऑप्शन, थ्री गिअर मोड इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.