टाइम्स मराठी | रिलायन्स जिओ ने काही महिन्यांपूर्वीच आपण नवा 5G मोबाईलन लॉन्च होणार असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी हा फोन केव्हा लॉन्च होणार हे माहीत नव्हते परंतु आता कंपनी लवकरच लॉन्चिंग डेट जाहीर करणार असल्याचं उघड झालं आहे. रिलायन्स 28 ऑगस्टला 46 व्या Annual general meeting चे आयोजन करणार आहे. या इव्हेंट वेळीच रिलायन्सचे चेअरमन बऱ्याच मोठ्या गोष्टींची घोषणा करणार आहेत. यामध्ये जिओ फोन 5G आणि जिओ 5G प्लान बद्दल देखील माहिती देण्यात येईल.
किंमत किती असेल?
Jio फोन 5G हा सर्वसामान्यांना परवडणारा मोबाइल असेल. याची किंमत 10 हजार रुपये किंवा यापेक्षा कमी असू शकते. अजून एका रिपोर्टच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतो. हा मोबाईल फोन केव्हा लॉन्च होणार ही तारीख आलेली नसली तरीही गेल्या महिन्यात त्याचे फिचर आणि फोटो पोस्ट करण्यात आले होते. त्यावेळी टिप्स्टर Arpitnahimila यांनी ट्विटरवर या जिओ 5G मोबाईल चा फोटो पोस्ट केला होता.
काय आहेत फीचर्स?
Jio च्या 5G मोबाइल ला 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन सोबत 6.5-इंचाचा LCD HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले मिळेल. हा मोबाईल फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध असून ड्युअल कॅमेरा सेटअप यामध्ये असणार आहे. या फोनमधील प्रायमरी कॅमेरा हा 13 मेगापिक्सल तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल असेल. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. स्नॅप ड्रॅगन 480+ प्रोसेसरसह jio च्या या 5G मोबाईल मध्ये 4GB रॅम आणि 32 GB स्टोरेज मिळू शकेल. त्याचबरोबर यामध्ये 5,000mAh बॅटरी मिळेल. ही बॅटरी 18 W चार्जिंगला सपोर्ट करू शकेल.
या फोनचा मॉडेल नंबर जिओ LS1654QB5 हा असून अंबानींने क्वालकॉम सोबत पार्टनरशिप केल्यामुळे या मोबाईल मध्ये स्नॅप ड्रॅगन चिपसेट बघायला मिळू शकतो. यामध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, ड्युअल सिम स्लॉट आणि n3, n5, n28, n40 आणि n78 5G ब्रँड साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर अशा फीचर्स ने हा मोबाईल परिपूर्ण आहे.