याठिकाणी लग्नासाठी भरतो मुलींचा बाजार, पैसे देऊन होते खरेदी; सरकारचीही आहे मान्यता

टाइम्स मराठी । आपण खरेदी करायचं म्हटलं तर बाजारात जातो. हा बाजार कपडे , भाजीपाला, चपला बुट, महिलांच्या साज शृंगार च्या वस्तू अशा बऱ्याच गोष्टींनी भरलेला असतो. परंतु तुम्ही कधी लग्नासाठी मुलगी विकत मिळते असा बाजार पाहिलाय का? ऐकण्यास आश्चर्य वाटेल परंतु जगातील असा एक देश आहे ज्या ठिकाणी लग्नासाठी मुलगी विकत मिळते. आणि यासाठी स्पेशली नवरींचा बाजार भरवला जातो. हिंदू धर्मामध्ये लग्न म्हणजे पवित्र बंधन मानले जाते. एखाद्या मुलीचे लग्न जमवण्यापूर्वी रीतसरपणे कांदे पोह्यांचा कार्यक्रम करून मुलीच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम होतो. परंतु या देशात आई वडील मुलींना डायरेक्ट बाजारात लग्नासाठी उभे करतात. आणि त्या ठिकाणी त्यांची बोली लावली जाते. जाणून घेऊया कुठे भरतो लग्नासाठी मुलींचा बाजार.

   

कुठे भरतो लग्नासाठी मुलींचा बाजार

युरोपीय संघाचा एक भाग म्हणून ओळख असलेल्या बुल्गारिया मध्ये अशा प्रकारचा व्यवहार केला जातो. त्या ठिकाणी कांदे बटाट्याच्या बाजाराप्रमाणे नवरी मुली आणून बसवतात. आणि त्या ठिकाणी पुरुष येऊन त्या मुलींना खरेदी करतात आणि त्यांना पत्नी बनवतात. एवढेच नाही तर मुलगा आणि मुलाच्या घरचे देखील या ठिकाणी मुली बघतात. मुलगी आवडल्यास मुलीची निवड करून तिला घरी घेऊन जातात. आणि त्या मुलीची बोली लावून रक्कम ठरवी जाते. आणि ही रक्कम तिच्या आई-वडिलांना दिली जाते. हे ऐकण्यासाठी विचित्र जरी असलं तरीही हे त्या ठिकाणचे सत्य आहे.

अनेक वर्षापासून सुरू आहे ही विक्री

बुल्गारिया येथे ज्या ठिकाणी हा नवरीचा बाजार भरतो त्या जागेला स्तारा जागोर असं म्हणतात. या ठिकाणी जी मुलगी मुलाला पसंत पडेल त्या मुलीचा भाव केला जातो. आणि ज्या किमतीने मुलीच्या घरचे खुश होतील अशी किंमत मुलगा मुलीच्या वडिलांना देऊन मुलीला घरी घेऊन येतात. यानंतर त्या मुलीला पत्नीचा दर्जा दिला जातो. ज्या मुलींचे आई-वडील मुलींच्या लग्नाचा खर्च करू शकत नाही, अशा मुलींसाठी हा बाजार भरवला जातो. बुल्गारिया येथे हा बाजार गेल्या अनेक वर्षापासून भरतो. त्या ठिकाणची ही प्रथा बनली आहे. यासाठी सरकारकडून देखील परवानगी मिळाली आहे.

प्रत्येक मुलीची किंमत वेगवेगळी

या बाजारात नवरी मुलींच्या किमती वेगवेगळ्या आहेत. या ठिकाणी बाजारामध्ये 300 ते 400 डॉलर पर्यंत मुलींची विक्री केली जाते. या मुलींचे कॉलेज पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले नसून समाज पूर्णपणे मागासलेला आहे. आणि या ठिकाणी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जाते. वर्षातून चार वेळा हा बाजार भरवला जातो. एवढेच नाही तर बाजारात विकण्यासाठी आणलेल्या नवरी मुलींचे आई-वडील देखील आनंदी असतात. त्याचबरोबर मार्केटमध्ये कलाइदझी समाजाचे लोक मुलींना मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतात.

नवरी मुली विकण्यासाठी नियमही लावले

बुल्गारिया या ठिकाणी भरणाऱ्या या बाजारामध्ये बरेच नियम लावण्यात आले आहेत. या नियमानुसार बाजारात मुली विकल्या जातात. या ठिकाणी सर्वात पहिला नियम म्हणजे ही मुलगी अविवाहित असायला हवी. अविवाहित असेल तरच त्या मुलींना जास्त किंमत दिली जाते. त्याचबरोबर दुसरा नियम म्हणजे मार्केटमध्ये विकायला आणलेल्या या मुली गरीब असायला हव्यात. म्हणजे जे लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यांना या बाजारात मनाई आहे. या मुलींची विक्री केल्यानंतर खरेदी केलेल्या मुलीला मुलाच्या घरच्यांकडून सुनेचा दर्जा मिळणे देखील आवश्यक आहे.