Toyota Innova : ना पेट्रोल, ना इलेक्ट्रिक चार्जिंग; लोहचुंबकाच्या उर्जेवर चालवून दाखवली गाडी, पहा व्हिडिओ

टाइम्स मराठी | आजवर आपण इलेक्ट्रॉनिक कार पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार पाहिल्या असतील. मात्र पहिल्यांदाच एका व्यक्तीने चक्क लोहचुंबकच्या साह्याने चालणारी Toyota Innova कार तयार केली आहे. होय, आपल्याला विश्वास बसणार नाही पण लोहचुंबक आधारित Innova कार तयार करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होत आहे. अनेकांनी तर ही कार खरेदी करण्याची मागणी देखील केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या लोहचुंबक कारविषयी.

   

इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर “आऊट ऑफ माईंड” या पेजवरून या लोहचुंबक कारचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका व्यक्तीने सर्वात प्रथम, कारच्या समोर एक लोहचुंबक लावून धरले होते. ज्यावेळी त्याच्या लक्षात आले की, या लोहचुंबकाकडे ही कार आकर्षित होत आहे तेव्हा त्याने कारच्यावरती देखील आणखीन एक लोहचुंबक लावले. यामुळे ही कार आपोआप चालू लागली. या कारमध्ये कोणतेही पेट्रोल, डिझेल नसताना तिने गती पकडली. आपल्याला विशेष वाटेल पण यावेळी ही कार सुसाट पळू लागली.

आपल्याला सांगू इच्छितो की, या व्यक्तीने लोहचुंबक कारचा प्रयोग रस्त्यावर चालणाऱ्या कार सोबत नाही तर एका लहान मुलांना खेळायला देण्यात येणाऱ्या कारसोबत केला आहे. मात्र त्याने केलेल्या या प्रयोगाची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. मुख्य म्हणजे, भविष्यात देखील लोहचुंबक कारची निर्मिती केली जाऊ शकते हे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अनेकांनी इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला हजारोंच्यावर लाईक दिल्या आहेत. तसेच या व्यक्तीचे देखील कौतुक करण्यात येत आहे.

यामुळे जर तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही हा घरगुती प्रयोग करून बघू शकता. दरम्यान, इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ शेअर करण्यात येतात. विशेष म्हणजे, या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक टॅलेंटेड व्यक्ती जगासमोर येत आहेत. हे व्यक्ती आपले डोके लढवून काहीतरी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. या प्रयोगांना नेटकऱ्यांकडून देखील तितकाच प्रतिसाद देण्यात येतो. आता देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लोहचुंबक कारचा व्हिडिओ सर्वांना थक्क करून सोडत आहे.