मादी चित्ता देतेय पिल्लांना शिकार करण्याचे धडे; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज वायरल (Viral Video) होत असतात. त्यापैकी वाइल्ड एनिमल्सचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यूजर्स कडून अशा व्हिडिओजला मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये वाघ, चित्ता, आणि बिबट्या त्यांचे भक्षक पकडताना दिसत आहे. एवढेच नाही तर जणू काही त्यांच्या पिल्लांना शिकार कशी करायची हे देखील शिकवत असल्याचं यात दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रत्येकाचं लक्ष केंद्रित करून घेत असून हा व्हिडिओ पाहिल्यावर वेगळाच आनंद मिळतो.

   

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात चित्ते उभे आहेत. त्यापैकी चित्ता मादी तर बाकी सर्व पिल्ले आहेत. जणू काही ही मादी त्यांना शिकार शिकवण्यासाठी मैदानात घेऊन आली आहे. त्यातच या मैदानात असलेल्या हरीणची शिकार करून फीमेल चिता या हरीणचा गळा पकडते. आणि तिची पिल्ले त्या हरीनी भोवती फिरतात. या ठिकाणी त्या मादी चित्तिणीचा उद्देश शिकार कशी करायची हे लेकरांना शिकवणे असा असेल. त्याचबरोबर हे पिल्ले देखील लक्ष देऊन शिकार कशी करायची हे शिकताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या फिमेल चिता आणि तिच्या पिल्लांचा व्हिडिओ instagram वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ big_cats_nam या युजर आयडी च्या माध्यमातून अपलोड करण्यात आला असून या युजरने छान असे कॅप्शन दिले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून वेगवेगळ्या कमेंट्स सुद्धा या व्हिडिओवर पडलेल्या आहेत.