Chanakya Niit Husband Wife : ‘या’ गोष्टीसाठी नवरा- बायकोने कधीही लाजू नये; पहा काय सांगते चाणक्यनीती

टाइम्स मराठी । नवरा बायकोचे नाते म्हणजे अत्यंत पवित्र असं नातं… आपल्या पत्नीचे रक्षण करणे, तिची काळजी घेणं आणि तिला व्यवस्थित सांभाळणं हे नवऱ्याचे कर्तृत्व असते तर आपला पती संकटात असताना त्याला साथ देणं, त्याच्या पाठीशी खंभीरपणे उभं राहणं हे प्रत्येक बायकोच कर्तव्य असते. सुखी वैवाहिक जीवनाचे हेच तर खरं सूत्र असते. विश्वगुप्त शिरोमणी आणि महान अर्थतज्ञ आचार्य चाणक्य यांनीही पती- पत्नीच्या नात्याबद्दल आपल्या नीतीत काही खास सल्ले दिले आहेत. त्यानुसार, पती-पत्नीने एकमेकांवरील प्रेम, त्याग आणि समर्पणात कधीही लाजू नये असं चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितलं आहे.

   

आचार्य चाणक्य यांच्यामते , वैवाहिक जीवनात पती-पत्नीचा एकमेकांवर अधिकार असतो. पती नाराज किंवा दुःखी असल्यास आपल्या प्रेमच्या जोरावर त्याला बळ देणं हे प्रत्येक पत्नीचे कर्तव्य असते. यामुळे नवरा- बायकोच्या नात्यात कधीच अंतर पडणार नाही आणि एकमेकांवरील प्रेम आयुष्यभर कायम राहण्यास मदत होईल . चाणक्य नीती नुसार, पती-पत्नीने एकमेकांवरील प्रेम, त्याग आणि समर्पणात कधीही लाज वाटून घेऊ नये. असे केल्यास नवरा बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि ते नाते हळूहळू तुटत जाते.

वैवाहिक जीवनाचा गाडा तेव्हाच पुढे सरकतो जेव्हा त्यामध्ये एकमेकांप्रती विश्वास असतो. एक प्रामाणिक व्यक्ती आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणाकडूनही प्रेमाची अपेक्षा करत नाही. त्यामुळे पत्नीने आपल्या पतीवरील प्रेम कधीही कमी करू नये. चाणक्यांनी आपल्या नीतीत नवऱ्यासाठी सुद्धा काही मार्गदर्शन केलं आहे. त्यानुसार, कधीही स्त्रीचे बाह्य रूप आणि सुंदरता पाहून लग्न करू नये तर तीच आपल्यावरील प्रेम, काळजी आणि तिचा आपल्यावरील विश्वास हि गुणे बघावी. कारण एक सुसंस्कृत स्त्री फक्त तिच्या पतीच्या जीवनात आनंदच आणत नाही तर तिच्यामुळे अनेक पिढ्यांचा उद्धार देखील होतो.