आधार कार्डच्या नियमात मोठा बदल; चला जाणून घ्या

टाइम्स मराठी । आजकाल आधारकार्ड हे महत्वाच्या डॉक्युमेंट पैकी एक बनले आहे. यामुळे आधार कार्ड अपडेट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधार कार्ड हे फक्त डॉक्युमेंट नव्हे तर प्रत्येक व्यक्तींचे ओळखपत्र बनले आहे. त्यामुळे शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी, बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, ऍडमिशन साठी आधार कार्डचा वापर केला जातो. परंतु ज्या व्यक्तींना हात किंवा हाताची बोटे नाहीत अशा व्यक्तींना आधार नोंदणी करण्यासाठी बरेच प्रॉब्लेम्स येतात. अशावेळी त्यांना आधार नोंदणी करता येत नाही. आणि इतर सोयी सुविधांचा लाभ देखील घेणे शक्य होत नाही.  परंतु आता असे होणार नाही. कारण आधार कार्ड संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे.

   

या पद्धतीने तयार करण्यात येणारा आधार कार्ड  

आधार कार्ड संदर्भात ट्विटर पोस्ट करून युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI ने माहिती दिली. त्यानुसार आता सरकारने आधार कार्ड तयार करण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. सरकारने आता बोटांचे ठसे नसणाऱ्या व्यक्तींसाठी पाऊल उचलले आहे. म्हणजेच आता फिंगरप्रिंट स्कॅन न होणाऱ्या व्यक्तीची आधार नोंदणी करण्यासाठी आयरिस  स्कॅन चा IRIS SCAN चा वापर करण्यात येणार आहे. म्हणजेच जे व्यक्ती शारीरिक दृष्ट्या सक्षम नाहीत  म्हणजे ज्यांना हात किंवा हाताची बोटे नाहीत अशा व्यक्तींना आधार कार्ड बनवणे आता सोपे होईल. सरकारने जारी केलेल्या नियमानुसार बोटांची ठसे न घेता डोळ्यांच्या स्कॅन द्वारे देखील आता आधार कार्ड काढता येणार आहे.

यामुळे घेतला हा निर्णय

केरळ येथे हाताची बोटे नसलेल्या व्यक्तीची आधार नाव नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी  या महिलेची नाव नोंदणी करण्यासाठी त्वरित पाऊले उचलण्याचे निर्देश दिले. यानंतर सरकारने आधार कार्ड बनवण्याच्या नियमात बदल केले आहे. त्याचबरोबर हाताची बोटे नसलेले आणि अन्य कारणामुळे बोटे किंवा बुबूळ दोन्ही बायोमेट्रिक प्रदान करण्यात असक्षम असलेल्या 29 लाख व्यक्तींना आधार क्रमांक जारी करण्यात आले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI च्या माध्यमातून दररोज 1000 व्यक्तींची आधार नोंदणी करण्यात येते.