टाइम्स मराठी । आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण बँकेकडून लोन घेत असतो. गाडी, घर, बिझनेस, शिक्षण, लग्न यासारख्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पर्सनल लोन, होम लोन यासारखे पर्याय निवडत असतो. या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्तीला या लोनची गरज पडते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बऱ्याचदा आपल्या मोबाईलवर बँक किंवा लोन सर्विसेस कडून कॉल येतो. या कॉल वर ते बरेच आकर्षक किमतीमध्ये लोन उपलब्ध आहे अशा प्रकारे बोलणं सुरू करतात. आपल्याला कोणतेही लोन घ्यायचे नसेल तरीही समोरच्या व्यक्तीकडून लोन घेण्यासाठी कन्व्हेन्स केले जाते. अशीच एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मात्र एका व्यक्तीने रेल्वे खरेदी करण्यासाठी ३०० कोटींचे कर्ज मागितलं आहे.
एका व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये निशा नावाची एक बँक कर्मचारी एका व्यक्तीला कॉल करते आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज हवं आहे का? असं विचारते . यावर उत्तर देताना 300 करोड रुपयांचे लोन हवे असल्याचं पुढचा व्यक्ती सांगतो. त्याच्या या उत्तरामुळे बँक कर्मचारीला धक्काच बसला. त्यानंतर लोन कशासाठी हवे आहे असं विचारल्यानंतर त्या व्यक्तीने रेल्वे खरेदी करायची असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत असून लोकांमध्ये हशा पिकला आहे.
यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी जुन्या लोन बद्दल विचारलं असता त्या व्यक्तीने सांगितले की सायकलचे लोन सुरू आहे. त्याने सायकल घेण्यासाठी यापूर्वी 1600 रुपयांचे कर्ज घेतले होते. ही ऑडिओ क्लिप 15 जुलैला शेअर करण्यात आलेली असून आतापर्यंत या ऑडिओ क्लिप ला 10 लाख पेक्षा जास्त लोकांनी ऐकलं आहे.