पृथ्वीच्या दिशेने मोठ्या वेगाने येत आहे उल्कापिंड; धडकल्यास होणार मोठं नुकसान

टाइम्स मराठी । अवकाशात पृथ्वी ग्रह तारे याशिवाय उल्का (Meteorite) सारख्या बऱ्याच गोष्टी आहे. आणि त्या उल्का प्रचंड वेगाने फिरत असतात. बऱ्याच वेळेस उल्का पृथ्वीच्या भोवती फिरताना पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळतात. त्यामुळे नुकसान होण्याची प्रचंड शक्यता असते. आता नुकतेच अमेरिकी अंतरिक्ष एजन्सी नासाच्या (NASA) कॅमेरा मध्ये एक दृश्य कैद झाले आहे. या दृश्यामध्ये एक उल्का पृथ्वीच्या दिशेने खूप वेगाने जात असल्याचे दिसत आहे. जर ही उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळल्यास खूप नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर वैज्ञानिक सतर्क झाले आहे.

   

नासाच्या म्हणण्यानुसार, रविवारी 16 जुलै रोजी नासाने विमानापेक्षा जास्त मोठ्या आकाराची उल्का पिंड पृथ्वीकडे येताना बघितली. तिचा आकार 910 फूट असून 2.26 मिलियन मिल लांबीपासून पृथ्वी च्या सर्वात जवळ असेल. या उल्केचा वेग हा 44,562 आहे मात्र ही उल्कापिंड पृथ्वीला धडकण्याची शक्यता नाही. बऱ्याचदा उल्का पृथ्वी जवळ येऊन इतर ग्रहाच्या कक्षेत फिरत असते. अशी माहिती नासाने दिली. त्याचबरोबर शास्त्रज्ञांनी या उल्काला लघुग्रह 2023 MG6 असे नाव दिले आहे.

बऱ्याचदा लघुग्रह 2023 MG6 हे हे गुरु आणि मंगळाच्या कक्षेत आढळतात. या कक्षामध्ये ते देखील इतरांप्रमाणेच फिरतात परंतु कधीकधी दुसऱ्या खगोलीय पिंडाशी आदळले जातात. त्याचप्रमाणे हा लघुग्रह 2023 MG6 पृथ्वीच्या दिशेने सरकत असल्याचा नासाच्या अहवालात सांगण्यात आलेलं आहे. परंतु याचा पृथ्वीला काही नुकसान होणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितलं. परंतु चुकून जरी ही उल्कापिंड पृथ्वीवर आदळली तर मात्र मोठे नुकसान होऊ शकते. जर लघुग्रह 2023 MG6 हा 25 मीटर पेक्षा लहान असेल तर त्याचा फारसा धोका होणार नाही परंतु पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचू शकतो. या लघुग्रहाची बाजू 25 मीटर पेक्षा जास्त आणि एक किलोमीटर पेक्षा कमी असेल तर ज्या ठिकाणी हा ग्रह पडेल त्या जागेभोवती कहर करू शकते. आणि जर हा लघुग्रह मोठा असेल तर जास्त नुकसान होऊ शकेल.