Google Map मध्ये रोलआउट करण्यात आले नवीन फिचर; आता दिसेल नवीन कलर पॅलेट 

टाइम्स मराठी । Google च्या माध्यमातून आपण फक्त सर्चिंग नाही तर, गुगलच्या वेगवेगळ्या सुविधेचा वापर करत असतो. त्यानुसार काही महिन्यापासून गूगल हे यूजर्स ला अप्रतिम अनुभव देण्यासाठी या सुविधेत वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत आहे. Google Map, Google Drive , Gmail यासारख्या बऱ्याच सुविधांचा वापर युजर्स करत असतात. आता कंपनीने गुगल मॅप्समध्ये नवीन फीचर ऍड करण्यात आले आहे. त्यानुसार युजर्सला आता गुगल मॅप मध्ये बदल दिसून येतील. या रोलआऊट करण्यात आलेल्या नवीन फीचर बद्दल ऑक्टोबर महिन्यात माहिती देण्यात आली होती.  त्यानंतर आता हे फीचर लॉन्च करण्यात आले आहे. जाणून घेऊया काय आहे हे फीचर

   

काय आहे हे फीचर

गुगलची लोकेशन मिळवण्यासाठी उपलब्ध असलेली सुविधा म्हणजेच Google Map. या गुगल मॅप च्या माध्यमातून  आपण आपल्याला हव्या असलेल्या लोकेशनला पोहोचू शकतो. या गुगल मॅप साठी कंपनीने नवीन कलर पॅलेट रोलआउट केले आहे. यापूर्वी देखील कंपनीने गुगल मॅप्स मध्ये बरेच वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले होते. या फीचर्समध्ये रूट्सचे इमर्सिव्ह व्ह्यू, डिटेल नेव्हिगेशन, ट्रांजिट फिल्टर्स  यांचा समावेश होतो. कंपनीने नवीन फीचर हे अँड्रॉइड युजरसाठीच नाही तर iOS आणि वेब युजरसाठी देखील उपलब्ध केले आहे.

या नवीन कलर मध्ये दिसेल गुगल मॅप

सध्या तुम्ही गुगल मॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला लाईट ग्रीन कलर ऑप्शन मध्ये पार्क आणि निसर्गसंदर्भात गोष्टी दिसतात. मॅप्स वर तुम्हाला रस्ते हे पांढरा ते राखाडी रंगांमध्ये दिसतात. बिल्डिंग आणि  स्ट्रक्चर लाईट येलो कलर ऑप्शन मध्ये दिसतात. परंतु आता तुम्हाला  नवीन फीचर रोलआउट झाल्यानंतर कलर मध्ये बदल दिसून येईल. या मॅप मध्ये उपलब्ध असलेल्या पिवळा कलर तुम्हाला डार्क ग्रे आणि स्काय ब्लू आणि ग्रीन कलर मध्ये देखील बदल झालेला दिसेल.

सर्व युजरसाठी रोल आऊट करण्यात आले फीचर

गुगल मॅप मध्ये रोल आउट करण्यात आलेले हे कलर फीचर सर्व युजर साठी उपलब्ध करण्यात आले आहे. या नवीन फीचर बद्दल google ने ऑक्टोबर महिन्यातच माहिती दिली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात या फीचर ची टेस्टिंग करण्यात आली होती.  गुगल मॅप वर रोल आउट करण्यात आलेले हे फिचर पाहण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरून ॲप अपडेट करावे लागेल.