3000 कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला आग; इलेक्ट्रिक गाडीमुळे घडली दुर्घटना

टाइम्स मराठी | नेदरलँडच्या किनारपट्टीवर 3000 कार घेऊन जाणाऱ्या मालवाहक जहाजाला भीषण आग लागण्याची माहिती मिळाली आहे. या जहाजामध्ये भारतीय क्रू मेंबर्स सुद्धा होते. आग लागल्यामुळे जहाजामध्ये असलेल्या या 23 क्रू मेंबर्सला हेलिकॉप्टर आणि बोटच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यापैकी एका कृ मेंबर चा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. जहाजात असलेल्या इलेक्ट्रिक गाडीमुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे.

   

मिळालेल्या माहितीनुसार, 199 मीटर लांब पनामा चा मालवाहक जहाज फर्मेंटल हायवे जर्मनीवरून इजिप्तला जात होते. परंतु नेदरलँडच्या किनाऱ्याजवळ या जहाजाला आग लागली. या जहाजाचे वजन 18,500 टन असून कार ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे जहाज करते. या जहाजाला आग लागली त्यावेळी यामध्ये 350 मर्सिडीज बेंज कार होती.. डच ब्रॉडकास्टर NOC यांनी सांगितले की या जहाजामध्ये सर्व क्रू मेंबर्स हे भारतीय होते. त्यांना हेलिकॉप्टर आणि बोटच्या साहाय्याने वाचवण्यात आले आहे. परंतु यामधील एका क्रू मेंबर्स चा मृत्यू झाला. तर बाकीचे क्रू मेंबर्स हे गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना उत्तर नेदरलँडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डज कोस्ट गार्डने सांगितलं की, बचाव जहाजांनी ही आग विझावी म्हणून पाणी ओतले परंतु जास्त पाणी ओतल्यामुळे जहाज बुडण्याचा धोका वाढला आहे. हे जहाज बुडू नये यासाठी दुसऱ्या जहाजाला आग लागलेले जहाज बांधण्यात आले आहे. त्याचबरोबर एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही आग विझवण्यासाठी बरेच दिवस लागू शकतात. कारण ही आग विझवणं अत्यंत अवघड आहे. कोस्टगार्डनुसार या जहाजामध्ये 2857 कार होत्या. यापैकी 25 इलेक्ट्रिक कार होत्या. त्यामुळे जहाजाला आग लागली. अशी आग विझवणे अत्यंत अवघड असल्यास देखील त्यांनी सांगितलं.