देव तारी त्याला कोण मारी! लिफ्टमधून दोन लहान मुले बाहेर येताच घडले असे की, व्हिडिओ पाहून तुमचा थरकाप उडेल

टाईम्स मराठी | सोशल मीडियावर दररोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता नुकताच असाच एक पुणे शहरातील व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये लिफ्टमधून दोन मुले बाहेर आल्यानंतर लिफ्ट अचानक खाली कोसळल्याचे दिसत आहे. काही मिनिटांमध्येच घडलेल्या या प्रकारामुळे दोन लहान मुलांचा जीव थोडक्यात वाचला आहे. याप्रकरणी लिफ्टच्या मेटेन्स एजन्सी आणि बिल्डरवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   

मुख्य म्हणजे, या सर्व घटनेचा व्हिडिओ लिफ्ट मधल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तर हा सर्व प्रकार पुण्यातील बावधन या भागात घडल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ फक्त ४७ सेंकदांचा आहे. व्हिडिओ दिसत आहे की, दोन लहान मुले लिफ्टमध्ये एकमेकांशी गप्पा मारत उभी आहेत. थोड्याच वेळात लिफ्टचे दार उघडते आणि हे दोघे देखील बाहेर पडतात. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा पुन्हा बंद होतो. याचवेळी जोरात आवाज होत लिफ्ट खाली येऊन आदळते.

या सर्व घडलेल्या प्रकारात या दोन लहान मुलांचा जीव वाचल्यामुळे सर्वजण समाधान व्यक्त करत आहेत. तसेच लिफ्टच्या मेटेन्नस एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यावर अनेक कमेंट झाल्या आहेत. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण या व्हिडिओत लागू पडली आहे. हा व्हिडिओ 27 जुलै रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्राइम कंट्रोल रिफॉर्म ऑर्गेनाइजेशन ऑल इंडिया या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान या सर्व घडलेल्या प्रकारानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात लिफ्टची मेटेन्नस एजन्सी, बिल्डर आणि इतरांवर भादवि 336 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत चौधरी यांच्याकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिफ्टची मेटेन्नस वेळेत केला असता तर आज ही वेळ आली नसती असे तक्रारदारांनी म्हटले आहे. थोडा वेळ जरी ही दोन लहान मुले लिफ्टमध्ये थांबली असती तर त्यांच्या जीवाचे बरे वाईट होऊ शकले असते. त्यामुळे त्याची जबाबदारी कोणी घेतली असती असा देखील प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.