स्वत:च्या मेंदूचे ऑपरेशन सुरु असताना महिला वाजवतीये व्हायोलिन; Video पाहून तुम्ही व्हाल थक्क

एखादे लहान ऑपरेशन जरी करायचे म्हणले तरी आपण प्रचंड भिवून जातो. अनेकजण तर ऑपरेशनच्या नावानेच दवाखान्यात जाण्यास नको म्हणतात. मात्र या सगळ्या गोष्टींबाबत एक वृध्द महिला अपवाद ठरली आहे. सध्या सोशल मीडियावर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन सुरू असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही महिला चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये व्हायोलिन वाजवताना दिसत आहे.

   

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक महिला थिएटरच्या कॉटवर झोपून व्हायोलिन वाजवत आहे. मुख्य म्हणजे, जी महिला व्हायोलिन वाजवत आहे तिच्याच मेंदूची शस्त्रक्रिया सुरू आहे. सर्व डॉक्टर मिळून या महिलेच्या मेंदूचे ऑपरेशन करत आहेत. मात्र याचवेळी ही महिला व्हायोलिन वाजवताना दिसत आहे. त्यामुळे ऑपरेशन करत असताना या महिलेला भूल देण्यात आली नव्हती का असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच एखादी महिला स्वतःचेच ऑपरेशन सुरू असताना व्हायोलिन कशी काय वाजवू होऊ शकते असा देखील प्रश्न सर्वांना पडला आहे. व्हिडिओ दिसत असल्यानुसार, ऑपरेशन सुरू असलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नाहीयेत. तसेच व्हायोलिन वाजवण्यात पूर्णपणे दंग झाली आहे. तर बाजूचे डॉक्टर देखील तिला व्हायोलिन वाजवण्यासाठी मुभा देताना दिसत आहेत.

आता या व्हिडिओतील महिलेचे धाडस पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही मजेशीर, धाडसी, काही चकित करणारे देखील असतात. असाच हा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला लाखों पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.