आधार कार्डवर डिजिटल साइन करणे अत्यंत गरजेचे; कशी आहे प्रोसेस पहा

टाइम्स मराठी । आज- काल कोणत्याही सरकारी कामासाठी आधार कार्डची गरज पडते. याशिवाय  ओळखपत्र म्हणून आपण आधार कार्ड  प्रत्येक ठिकाणी दाखवत असतो. आधार कार्ड हे प्रचंड गरजेचे असल्यामुळे आपल्या पॉकेटमध्ये नेहमी ठेवावे लागते. परंतु हे आधार कार्ड हरवण्याचे आणि खराब होण्याचे चान्सेस प्रचंड आहेत. अशावेळी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी तुम्ही आधार कार्ड कॉफी सोबतच ऑनलाईन डिजिटल कॉपी देखील ठेवू शकता. जेणेकरून आधार कार्ड ची कॉपी हरवल्यानंतर ऑनलाइन स्मार्टफोन मध्ये असलेली आधार कार्ड चे डिजिटल कॉपी तुम्ही दाखवू शकता.

   

तुम्हाला माहित आहे का? भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानुसार, आधारकार्डची डिजिटल कॉपी ही हार्ड कॉपी प्रमाणेच व्हॅलिड आहे. म्हणजे तुम्ही आधार कार्डची डिजिटल कॉपी सोबत ठेवू शकतात. आणि गरज असेल तेव्हा दाखवू देखील शकतात. पण डिजिटल आधार कार्ड काढण्यासाठी  ई – स्वाक्षरी करणे अत्यंत गरजेचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ई – स्वाक्षरी कशा पद्धतीने करायची? आजच्या बातमीमध्ये आपण हेच पाहणार आहोत.

जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एखादा नोकरी किंवा गरजेच्या कामासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन साइन कशा पद्धतीने केली जाते हे माहीत असेल. अशावेळी प्रत्येक ठिकाणी ई स्वाक्षरी करणे सर्वात कठीण काम आहे. आधार कार्डचा हा सर्वात मोठा फायदा आहे, कारण यामुळे तुम्हाला ई-साईन करण्याची सुविधा मिळते. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही  कागदपत्रावर वर्चुअल साइन करू शकतात. या साईनला क्रिप्टोग्रफिकली डिझाईन केले जाते. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका आणि फसवणूक होण्याचे चान्सेस कमी होतात.

यामुळे आहे डिजिटल साइन करणे गरजेचे

ज्या आधार कार्डवर डिजिटल साइन करण्यात आलेली नाही  त्या आधार कार्डचा वापर सरकारी कामांसाठी केला जाऊ शकत नाही. त्यामुळे आधार वर डिजिटल सिग्नेचर व्हेरिफाय करणे अत्यंत गरजेचे आहे. ही सिग्नेचर पूर्णपणे वॅलिड मानली जाते. ही डिजिटल सिग्नेचर करण्यासाठी सर्वात पहिले तुमच्याकडे आधारकार्ड ची PDF कॉपी असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही डाऊनलोड करू शकतात.

अशा पद्धतीने करा डिजिटल साइन

1) तुम्हाला डिजिटल सिग्नेचर करायची असेल तर सर्वात आधी आधार कार्ड PDF डाउनलोड करावी लागेल.
2) त्यानंतर  तुम्हाला पासवर्ड टाकून व्हॅलिडीटी अननोनच्या आयकॉनवर राईट क्लिक करावी लागेल.
3) त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर प्रॉपर्टीवर क्लिक करावे लागेल.
4) सिग्नेचर प्रॉपर्टी वर क्लिक केल्यानंतर शो सिग्नेचर ऑप्शन दिसेल.त्यावर क्लिक करावे लागेल.
5) शो सिग्नेचर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन पाथ मध्ये  NIC 2011 साठी SUB CA किंवा राष्ट्रीय माहिती केंद्र आहे की नाही हे तपासावे लागेल.
6) हे तपासल्यानंतर मार्क करण्यासोबतच तुम्हाला ट्रस्ट टॅब वर क्लिक करावे लागेल.
7) त्यानंतर ADD TO TRUSTED IDENTITY हा ऑप्शन येईल. या ऑप्शन वर क्लिक करावा लागेल.
8) या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेक्युरिटी विंडो ओपन होईल. या विंडोवर क्लिक केल्यानंतर ओके ऑप्शन दिसेल.
9) OK ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला VALID SIGNATURE हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर व्हॅलिडेशन पूर्ण करावे लागेल.
10) ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आधार कार्डवर तुमचे डिजिटल सिग्नेचर रेकॉर्ड केलं जाईल.