Aadhar Card Download : आता घरबसल्या Download करा तुमचं आधार कार्ड; ‘या’ स्टेप्स फॉलो करा

टाइम्स मराठी । आजकाल आधार कार्ड (Aadhar Card Download) प्रत्येक कामासाठी महत्त्वाचा आहे. आपण बऱ्याचदा आधार कार्ड आपलं ओळखपत्र म्हणून देखील दाखवतो. काही सरकारी योजना, बँक केवायसी, ऍडमिशन, या सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड ची गरज असते. त्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. आपल्याला आधार कार्ड प्रत्येक कामासाठी खिशात घेऊन फिरावं लागतं. परंतु आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI यांच्याकडून आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

   

UIDAI यांनी घेतलेल्या निर्णयामुळे फिजिकल रूपामध्ये आधार कार्ड ची कॉपी घेऊन न जाता आपण मोबाईल मध्ये डिजिटल साईड आणि पासवर्ड प्रोटेक्टर इलेक्ट्रॉनिक कॉपी आपल्या सोबत ठेवू शकतो. ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड चे व्हर्जन डाऊनलोड (Aadhar Card Download) करण्यासाठी आपल्याला UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर दिलेली प्रोसेस केल्यानंतर आपल्याला डिजिटल रूपात आपले आधार कार्ड मिळेल.

अशा पद्धतीने डाऊनलोड करा आधार कार्ड- (Aadhar Card Download)

1) सर्वात आधी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI च्या www.uidai.gov.in या अधिकारीक वेबसाईटवर जा.
2) त्यानंतर होम पेजवर जाऊन माय आधार या ऑप्शन वर जा.
3) त्यानंतर डाउनलोड आधार कार्ड या ऑप्शन वर क्लिक करा.
4) त्यानंतर नवीन पेज ओपन होईल
5) या पेजवर आधार नंबर आणि EID टाका.
6) त्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव पिन कोड आणि इमेज कॅप्चा भरावा लागेल.
7) त्यानंतर तुम्हाला ओटीपी या ऑप्शन वर जाऊन क्लिक करावं लागेल. तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी तुम्हाला टाकावा लागेल.
8) ओटीपी टाकल्यानंतर डाउनलोड आधार या बटणावर क्लिक करा.
9) तुमचेआधार कार्ड PDF फाईल च्या रूपामध्ये तुम्हाला डाऊनलोड करता येईल.
10) ही PDF फाईल खोलण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल.
11) हा पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि तुमचे जन्म वर्ष YYYY या फॉरमॅटमध्ये असेल.