‘या’ सोप्या पद्धतीने लॉक करा तुमचे आधार कार्ड; डेटा राहील सुरक्षित

टाइम्स मराठी । महत्त्वाचे डॉक्युमेंट पैकी एक असलेले आधार कार्ड हे कोणत्या ना कोणत्या कामासाठी गरजेचे असते. आधार कार्डचा वापर आजकाल सर्वच ठिकाणी केला जातो. या आधार कार्ड शिवाय आपले सर्व डॉक्युमेंट्स अपूर्ण राहतील हे खरं. परंतु तुमचे आधार कार्ड सुरक्षित आहे का? आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी UIDAI ने बरेच फीचर्स लॉन्च केले आहेत हे तुम्हाला माहित आहे का? नसेलच. चला तर मग UIDAI ने उपलब्ध केलेल्या फीचर्स बद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत.

   

तुम्ही डार्क वेब हे प्रकरण ऐकलं असेल. या प्रकरणा सोबतच लाखो भारतीयांची पर्सनल माहिती डार्क वेब या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. ही माहिती उघड झाल्यानंतर अमेरिकी सायबर सुरक्षा एजन्सीने दावा केला होता की, हॅकर्स ने डार्क वेब वरून फाइल्स हटवल्या आहेत. डार्क वेबवर उपलब्ध करण्यात आलेल्या डेटामध्ये युजर्स नेम, पत्ता, आधार नंबर, फोन नंबर यासारखे बरेच डिटेल्स उपलब्ध होते. त्यानंतर आधार सुरक्षेचा सर्वात मोठा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच सुरक्षेसाठी UIDAI  ने खास फीचर्स आणलं आहे.

काय आहे हे फीचर

UIDAI  युजर्स ला डेटा सिक्युरिटी साठी बरेच फीचर्स  देत असतो. या फीचर्स पैकी एक म्हणजेच आधार कार्ड लॉक करणे. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक करू शकतात. या फिचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला सोपी पद्धत अवलंबवावी लागेल. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बायोमेट्रिक्स ला लॉक करावे लागेल. आधार कार्ड लॉक करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर 16 अंकाचा व्हर्च्युअल आयडी बनवावा लागेल. कारण या वर्चुअल आयडी च्या माध्यमातूनच तुम्ही आधार लॉक अनलॉक करू शकतात. त्यासाठी पुढील पद्धत वापरा.

अशा पद्धतीने करा आधार लॉक

1)  आधार बायोमेट्रिक्स ला लॉक करण्यासाठी सर्वात अगोदर UIDAI च्या वेबसाईटवर जा.
2) त्यानंतर तुम्हाला VID वर्चुअल आयडी जनरेट करण्याचे ऑप्शन दिसेल.
3) जनरेट केल्यानंतर तुम्हाला आधार लॉक करण्यासाठी वर्चुअल आयडी नाव पिन कोड या सोबतच कॅप्चा कोड भरावा लागेल.
4) त्यानंतर रजिस्टर नंबर वर OTP येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड बायोमेट्रिक लॉक करता येईल.

काय होईल फायदा

UIDAI ने डेटा सिक्युरिटी साठी उपलब्ध केलेल्या  आधार बायोमेट्रिक्स लॉक या फीचर चा वापर केल्यावर तुमचे बायोमेट्रिक कोणीच वापरू शकणार नाही. हे फीचर्स युजर्स च्या सेक्युरिटी साठी उपलब्ध करण्यात आले आहे. एखाद्या कामासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला वर्चुअल आयडी दिला किंवा शेअर केला तर तो व्यक्ती आधार नंबर वापरू शकेल परंतु बायोमेट्रिक्स पर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि डेटा लीक होण्याचा प्रश्न उभा राहणार नाही.