Aadhar Card Update : आधार कार्डवरील माहिती किती वेळा बदलू शकता? काय आहे UIDAI चे लिमिट

Aadhar Card Update । आधार कार्ड हे सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनले आहे. भारतीयांची ओळख म्हणून आधार कार्ड ओळखले जाते. आधार कार्ड मध्ये आपली महत्त्वाची माहिती उपलब्ध असते. या माहितीच्या माध्यमातून आपली ओळख आपण दाखवत असतो. आधार कार्ड हे छोट्या साईज मध्ये पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे आपण कोठेही घेऊन जाऊ शकतो. आज-काल शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड वापरले जाते. आधार कार्ड महत्त्वाचे असल्यामुळे जर तुमच्या आधार कार्डवर चुकीची माहिती दिलेली असेल किंवा चुकलेली माहिती असेल तर  ते अपडेट करणे (Aadhar Card Update) गरजेचे आहे.

   

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आधार कार्ड आपण किती वेळेस अपडेट करू शकतो. किंवा आधार कार्डवर  देण्यात आलेली माहिती चुकीची असेल तर आपण किती वेळेस या माहितीमध्ये बदल करू शकतो. आपण आधार कार्डवर उपलब्ध असलेली माहिती जास्त वेळेस बदलवू शकत नाही. आधार कार्ड बनवणारी कंपनी UIDAI आणि सरकारकडून आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी एक लिमिट निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या आधार कार्ड वर असलेल्या माहितीमध्ये बदल करू शकतात.

एवढ्या वेळेस करू शकतात आधार मधील माहिती करेक्ट– Aadhar Card Update

आधार कार्ड वर जर तुमचे नाव चुकीचे टाकल्या गेले असेल तर तुम्ही फक्त दोन वेळेस आधार कार्ड वरील तुमचे नाव चेंज (Aadhar Card Update) करू शकतात. यासोबतच आधार कार्ड वरील चुकीची जन्म दिनांक, लिंग तुम्ही एकाच वेळेस बदलवू शकतात. परंतु आधार कार्ड मध्ये अशी एक माहिती आहे जी तुम्ही अनलिमिटेड वेळेस बदलू शकतात. ती माहिती म्हणजे ऍड्रेस. तुम्ही तुमच्या घराचा पत्ता हवे तेवढ्या वेळेस बदलवू शकतात. याशिवाय जर आधार काढला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल. किंवा मोबाईल नंबर चुकीचा टाकण्यात आला असेल तर तुम्ही मोबाईल नंबर देखील एकदाच बदलवू शकतात.

लिमिट संपल्यानंतर या पद्धतीने करू शकतात करेक्शन

आधार कार्ड वर नाव जन्म, दिनांक, लिंग अपडेट करण्याची लिमिट संपल्यानंतरही बदल करण्याची गरज असेल तर यासाठी विशेष परिस्थितीमध्ये मंजुरी दिली जाते. त्यासाठी तुम्हाला आधार च्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये  संपर्क करावा लागेल. किंवा त्या ठिकाणी जावे लागेल. याशिवाय तुम्ही UIDAI या वेबसाईटला ईमेल देखील करू शकतात. परंतु सांगितलेले कारण विशेष असेल तरच तुम्हाला आधार मध्ये चेंजेस करण्यास परवानगी दिली जाते. त्यासाठी तुम्हाला पुरावा जोडणे देखील गरजेचे आहे.