Aadhar Card Update : Whatsapp किंवा E-mail वर शेअर करू नका आधार कार्ड; UIDAI चा गंभीर इशारा

टाइम्स मराठी । आधार कार्ड हे (Aadhar Card Update) आपल्या कामासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. बऱ्याच ठिकाणी ओळखपत्र म्हणून देखील आपण आधार कार्ड दाखवतो. एवढेच नाही तर सरकारी योजना, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, स्कॉलरशिप साठी, ऍडमिशन यासारख्या बऱ्याच कामांसाठी आपल्याला आधार कार्ड ची गरज पडते. आधार कार्ड शिवाय आपल्याला बऱ्याच ठिकाणी फिरण्यास जाता येत नाही. यातच आपले आधार कार्ड अपडेट नसेल आणि आपल्याला व्हाट्सअप किंवा ई- मेलच्या माध्यमातून आधार अपडेटचा मेसेज आल्यास चुकून देखील त्यांना हवे असलेले कागदपत्र पाठवू नका. या माध्यमातून तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यता आहे. याबाबत UIDAI ने गंभीर इशारा दिला आहे.

   

बऱ्याचदा आधार कार्ड अपडेट (Aadhar Card Update) करण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारकडून सूचना जारी करण्यात येत असतात. याप्रकारे तुम्हाला जर व्हाट्सअप आणि ईमेलवर आधार कार्ड अपडेट करण्याचा मेसेज आला असेल तर तुम्हाला सावधानी बाळगण्याची गरज आहे. याबाबत UIDAI ने गंभीर इशारा नागरिकांना दिला आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी व्हाट्सअप आणि ईमेलवर सांगितलेली कोणतीही कागदपत्रे आणि आधार कार्ड देखील यामध्ये पाठवू नका. यामुळे तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर करण्यात येऊ शकतो.

ट्विटर वरून दिली माहिती

याबाबत UIDAI ने ट्विटर वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. UIDAI कधीच आधार अपडेट करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे कागदपत्रे ऑनलाईन मागवत नाही असं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार कोणीही कागदपत्रांची मागणी केल्यास त्यांना कागदपत्र पाठवू नका. डॉक्युमेंट पाठवल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते यामुळे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फक्त अधिकृत मार्गांचा वापर करा.

UIDAI ने दिली आधार कार्ड डाऊनलोड करण्याची परवानगी

काल युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI यांच्याकडून आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता आधार कार्ड ची प्रिंट सोबत घेऊन न जाता तुम्ही डिजिटल पद्धतीने आधार हाताळू शकतात. म्हणजेच तुम्ही मोबाईल मध्ये तुमचा आधार कार्ड डाऊनलोड करून ठेवू शकतात. त्याचबरोबर डिजिटल पद्धतीने म्हटल्यावर तुमचा आधार कार्ड लिंक होण्याची भीती देखील नाही. कारण डाउनलोड होणारे आधार कार्ड पीडीएफ फाईल मध्ये दिल्या जाणार आहे. आणि या पीडीएफ फाईल ला पासवर्ड देखील देण्यात येणार आहे.त्यानुसार तुम्हाला ऑनलाइन आधार कार्ड चे व्हर्जन डाऊनलोड करण्यासाठी UIDAI च्या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर दिलेली प्रोसेस केल्यानंतर आपल्याला डिजिटल रूपात आपले आधार कार्ड मिळेल.

अशा पद्धतीने करा आधार अपडेट– (Aadhar Card Update)

जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असल्यास किंवा व्हेरिफाय करायचं असल्यास माय आधार पोर्टल वर जा याशिवाय तुम्ही आधार सेवा केंद्रावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने आधार अपडेट करू शकतात.

जर तुम्ही आधार कार्ड व्हेरिफाय करू इच्छित असाल तर वापरा ही पद्धत

1) सर्वात अगोदर आधार कार्ड च्या अधिकारिक udai.gov.in या वेबसाईटवर जा.
2) ही वेबसाईट ओपन झाल्यावर होम पेजवर जा.
3) त्यानंतर त्या ठिकाणी दिलेल्या आधार सर्विस या ऑप्शन वर क्लिक करा.
4) आणि आधार नंबर व्हेरिफाय करा.
5) यानंतर तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकून आधार कार्ड व्हेरिफाय करा.

आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी करा ही प्रोसेस

1) सर्वात पहिले युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI च्या www.uidai.gov.in या अधिकारीक वेबसाईटवर जा.
2) त्यानंतर होम पेजवर जाऊन माय आधार या ऑप्शन वर जा.
3) त्यानंतर डाउनलोड आधार कार्ड या ऑप्शन वर क्लिक करा.
4) त्यानंतर नवीन पेज ओपन होईल
5) या पेजवर आधार नंबर आणि EID टाका.
6) त्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव पिन कोड आणि इमेज कॅप्चा भरावा लागेल.
7) त्यानंतर तुम्हाला ओटीपी या ऑप्शन वर जाऊन क्लिक करावं लागेल. तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी तुम्हाला टाकावा लागेल.
8) ओटीपी टाकल्यानंतर डाउनलोड आधार या बटणावर क्लिक करा.
9) तुमचा आधार कार्ड पीडीएफ फाईल च्या रूपामध्ये तुम्हाला डाऊनलोड करता येईल.
10) ही पीडीएफ फाईल खोलण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल.
11) हा पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि तुमचे जन्म वर्ष YYYY या फॉरमॅटमध्ये असेल.