आता ट्रकमध्येही AC बंधनकारक होणार; गडकरींची मोठी घोषणा

टाइम्स मराठी | मालवाहतूक करण्यासाठी ट्रकचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो. पण या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या ड्रायव्हरला बरेचदा त्रास सहन करावा लागतो. त्यांचे आयुष्य अत्यंत हालाकीचे असते. बिकट परिस्थितीमध्ये ते त्यांचा उदरनिर्वाह करत असतात. त्याचबरोबर एखादे लांबचे लोकेशन असेल आणि घाट रस्ता असेल तर या ट्रक ड्रायव्हरला तासनतास किंवा बरेच दिवस एकाच ठिकाणी सर्व गोष्टींचा सामना करत थांबावं लागतं. ऊन, वारा आणि पावसाचा त्रास सहन करत त्यांना जीवन जगावे लागते.अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.

   

2025 पासून देशातील सर्व ट्रकच्या केबिनमध्ये एसी बसवण्यात येईल अस नितीन गडकरी यांनी म्हंटल आहे. एका ऑटोमोबाईल कंपनीच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रक चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे

गडकरी म्हणाले, मालवाहतूक करत असताना ट्रक चालक 43 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान असताना देखील ट्रक चालवतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा निर्णय घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. पण बऱ्याच जणांनी ट्रक चा खर्च वाढेल असं म्हणत या निर्णयाला विरोध केला. पण आता आपण केबिनमध्ये एसी बसवण्याच्या निर्णयावर आपण सही केली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

गर्मीमध्येही आपल्या देशात काही ड्रायव्हर 12 किंवा 14 तास गाडी चालवतात. इतर देशांमध्ये, बस आणि ट्रक चालक किती तास ड्युटीवर असू शकतात हे निश्चित केले आहे. पण आपल्याकडे हा नियम कधी येईल हे मात्र गडकरींनी सांगितले नाही. दरम्यान, जर प्रत्येक ट्रक मध्ये एसी बसवण्याचा निर्णय झाल्यास अतिरिक्त 15 हजारांचा खर्च होण्याची शक्यता आहे, परंतु यामुळे ट्रक चालक अगदी आरामात गाडी चालवू शकतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होईल.