वैदिक शास्त्रानुसार त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींवर होऊ शकतो परिणाम

टाइम्स मराठी | वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण 12 प्रकार असतात. या शास्त्रानुसार कोणताही ग्रहांच्या राशींच्या बदलाचा प्रभाव हा सर्व राशींच्या व्यक्तींवर पडत असतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ दोन्ही प्रकारे दिसून येतो. बऱ्याचदा एखाद्या ग्रहाचा प्रभाव राशींवर पडल्यास त्या राशीतील व्यक्ती मालामाल होतात. लवकरच त्रिग्रही योग जुळून येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा योग म्हणजे तिन्ही ग्रह एकाच राशीत आल्यावर त्रिग्रही योग तयार होतो. हा त्रिग्रही योग अत्यंत दुर्मिळ मानला जात असून या ग्रहाचा फायदा बऱ्याच राशींच्या लोकांना होणार आहे.

   

1) सिंह-

सिंह राशीला सूर्याच्या मालकीची राशी मानले जाते. या राशीमध्ये मंगळ बुध आणि शुक्राचा संयोग असून या तिन्ही राशी मिळून आता त्रिग्रही योग जुळून येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 25 जुलै 2023 ला बुध ग्रहणे सिंह राशीमध्ये प्रवेश केला होता. आता पन्नास वर्षानंतर सिंह राशि मध्ये बुध मंगळ आणि शुक्र तिन्ही ग्रह एकत्र आले आहेत. यामुळे सिंह राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या लोकांना खास फायदा होणार आहे.त्यांच्या जीवनात, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये देखील आनंद राहील. त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. या राशीच्या व्यक्तींनी या काळात नवीन काम सुरू केले तर धनलाभ देखील होऊ शकतो.

2) मेष

12 राशींपैकी एक असलेली मेष राशीच्या लोकांना या त्रिग्रह योगाचा प्रचंड फायदा होणार आहे. या योगामुळे मेष राशींच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या व्यक्तींना मानसन्मान मिळेल आणि नोकरदार वर्गाला शुभ परिणाम मिळू शकतील. या काळात जमीन इमारत वाहन खरेदी देखील होऊ शकते. या योगामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील बघायला मिळेल.

3) कुंभ

सिंह राशीमध्ये तीन ग्रह एकत्र आल्यामुळे म्हणजेच त्रिग्रह योगामुळे कुंभ राशींच्या व्यक्तींवर या योगाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या व्यक्तींची दीर्घकाळ पेंडिंग राहिलेले काम पूर्ण होतील. कुंभ राशींच्या व्यक्तींना लाभासाठी हा काळ अनुकूल असून प्रगतीच्या क्षेत्रामध्ये नवीन संधी तयार होऊ शकतात. एवढेच नाही तर या व्यक्तींच्या बिजनेस मध्ये देखील मोठा फायदा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

4) तूळ

तूळ राशींच्या व्यक्तींना त्रिग्रह योग हा अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या काळामध्ये तूळ राशीच्या व्यक्तींच्या समस्या दूर होतील. या योगामुळे तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. एवढेच नाही तर या काळामध्ये पदोन्नतीची दाट शक्यता आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. या काळात कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. परंतु वादाची शक्यता देखील या काळात निर्माण होत आहे. आर्थिक लाभ होईल.