Laptop निर्माता कंपनीने बनवली Electric Scooter; दिवाळीपर्यंत होणार लाँच

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईककडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. कमी बजेट मध्ये जास्त परफॉर्मन्स देणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणण्याचा प्रयत्न कंपन्या करत आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल मार्केट मध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली आहे. त्यातच आता भर म्हणजे लॅपटॉप निर्माता कंपनी एसर ने सुद्धा इलेक्ट्रिक स्कुटर सेगमेंट मध्ये पाऊल ठेवले आहे. Acer कंपनीच्या या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण करण्यात आले.

   

ग्रेटर नोएडामध्ये आयोजित केलेल्या एका EV इंडिया एक्स्पो 2023 वेळी एसर लॅपटॉप निर्माता कंपनीची MUVI 125 4G या इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण करण्यात आले. लॅपटॉप निर्माता कंपनी एसरने ही इलेक्ट्रिक स्कूटर eBikeGo या इलेक्ट्रिक eBikeGo कंपनीसोबत मिळून डेव्हलप केली आहे. Acer MUVI 125 4G यासोबतच दोन स्वॅपेबल बॅटरी देखील लाँच केली आहे. यासोबतच कंपनीने यामध्ये इंप्रूव्ह स्टॅबिलिटी आणि हॅन्डलिंग साठी 16 इंच व्हील्स दिले आहे.

100 किलोमीटर पर्यंत रेंज –

Acer MUVI 125 4G या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 KW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही स्कूटर फुल चार्ज केल्यास १०० किलोमीटर पर्यंत रेंज देते. एवढेच नाही तर स्कूटरचे टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रति तास इतकं असणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर च्या किमती बद्दल अजून खुलासा केलेला नाही. Acer ची ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, यानंतर आणखी अनेक नवीन स्कूटर कंपनीकडून लॉन्च केल्या जाऊ शकतात.