Acer G Series TV : Acer ने G Series मध्ये लाँच केला नवा Smart TV

Acer G Series TV : Acer कंपनी भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट लॉन्च करत असते. Acer कंपनीच्या Smart TV या ग्राहकांना आकर्षित करतात. सध्या मार्केटमध्ये Google TV, Smart TV आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असलेल्या टीव्हींची मोठी चलती आहे.  त्यानुसार आता ACER कंपनीने 3 साईज मध्ये नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे. यामध्ये वेगवेगळे फीचर्स दिले असून, अप्रतिम ऑडिओ विज्युअल कॉलिटी देखील उपलब्ध आहे. ACER  कंपनीच्या या तिन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये उपलब्ध असलेले फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

   

डॉल्बी ऍटमॉस

Acer G Series TV मध्ये इमर्सिव्ह, थ्री डायमेन्शनल साऊंड अनुभव मिळतो. यामध्ये देण्यात आलेल्या डॉल्बी ऍटमॉस मुळे  युजर्सला कोणतीही सिरीयल पाहताना किंवा चित्रपट पाहताना अप्रतिम थेटर अनुभव मिळतो. यासोबतच गेमिंग सेशन साठी देखील हा स्मार्ट टीव्ही चांगला अनुभव प्रदान करते. या स्मार्ट टीव्ही मध्ये उपलब्ध असलेला डॉल्बी ऍटमॉस ऑडिओ देखील अप्रतिम आहे.

MEMC टेक्नॉलॉजी

ACER कंपनीचा हा नवीन लॉन्च करण्यात आलेली स्मार्ट टीव्ही MEMC म्हणजेच मोशन एस्टिमेशन मोशन कंपल्सेशन टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. जेणेकरून स्पीड मध्ये असलेले दृश्य सहज आणि क्रिस्टल स्पष्ट स्पीड ऑफर करते. जेणेकरून स्मार्ट टीव्हीवर कोणताही प्रोग्राम पाहताना चांगला अनुभव मिळतो. या सिरीज मध्ये एक बिलियन पेक्षा जास्त कलर देणारे पॅलेट लॉन्च करण्यात आले आहे. हे पॅलेट रियल टू लाइफ कलर प्रदान करते.

सुपर ब्राईटनेस आणि ब्लॅक लेव्हल ऑगमेंटेशन

ACER कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही सुपर ब्राईटनेस आणि ब्लॅक लेव्हल ऑग्मेंटेशन देते. जेणेकरून एक अप्रतिम कॉन्ट्रास्ट तयार होतो. या स्मार्ट टीव्ही ला  HDR10 आणि HLG सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टटीव्ही मध्ये अप्रतिम फिडेलिटी ऑडिओ उपलब्ध आहे.  जेणेकरून स्मार्टटीव्ही ला 24 W मजबूत आउटपुट प्रदान होतो. या ऑडिओ साठी पावरफुल स्पीकर स्मार्ट टीव्ही मध्ये देण्यात आले आहे.

किंमत– Acer G Series TV

Acer G Series TV सिरीज मध्ये कंपनीने 32 इंच 43 इंच आणि 55 इंच च्या स्मार्ट टीव्ही लाँच केल्या आहे. या स्मार्ट टीव्हीच्या किमती वेगवेगळ्या आहेत. यातील 32 इंच  साईज असलेल्या स्मार्ट टीव्हीची किंमत 21,999 रुपये आहे. यासोबतच 43 इंच स्मार्ट टीव्हीची किंमत 42,999 ठेवण्यात आली आहे. तर G सिरीज मधील 55 इंच ची स्मार्ट टीव्ही 62,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकते