Acer लॉन्च केली H Pro TV Series; मिळणार ‘हे’ खास फीचर्स

टाइम्स मराठी । आज काल प्रत्येकाच्या घरामध्ये आपण स्मार्ट टीव्ही उपलब्ध असल्याचे पाहतो. यासोबतच भारतीय बाजारपेठेमध्ये सातत्याने नवनवीन आणि अपडेटेड स्मार्ट TV येत असतात. स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल पाहायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Acer ने भारतामध्ये H Pro TV Series लाँच केली आहे. आज आपण या सिरीजचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत जाणून घेणार आहोत.

   

किंमत

Acer कंपनीने मागच्या वर्षी लॉन्च केलेले H SERIES स्मार्ट टीव्हीमध्ये अपग्रेड करत यंदा फेस्टिव सीजन मध्ये H Pro TV Series लॉन्च केली आहे. यामध्ये कंपनीने 43 इंच, 50 इंच, आणि 55 इंच च्या स्क्रीन असलेल्या ३ Smart TV भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केल्या आहेत. त्यानुसारच 43 इंचच्या स्मार्ट टीव्ही ची किंमत 26,999 रुपये एवढी आहे. 50 इंचच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 32,999 एवढी आहे. आणि 55 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 38,999 एवढी आहे.

Acer H Pro TV Series स्पेसिफिकेशन –

Acer H Pro TV Series मध्ये 43 इंच 50 इंच आणि 55 इंच असलेले स्क्रीन उपलब्ध आहे. या स्क्रीनची साईज सोडून या Smart TV चे रिझोल्युशन पूर्णपणे सेम आहे. या तिन्हीही स्मार्ट टीव्ही 4K रिझोल्युशन प्रदान करतात. यामध्ये देण्यात आलेला डिस्प्ले LCD, स्लिम बेजल, फ्रेमलेस डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. या तिन्हीही Smart TV 60 HZ रिफ्रेश रेट सह येतात. या स्मार्ट TV गुगल टीव्ही वर बेस्ड असून ANDROID 11 सह उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये ARM CORTEX A55 कोर सह क्वाड कॉम प्रोसेसर देण्यात आले आहे.

Acer H Pro TV Series फीचर्स –

Acer H Pro TV Series च्या तिन्ही Smart TV मॉडेलमध्ये अँड्रॉइड टीव्हीॲप्स वापरण्यात आले आहे. या Smart TV ला बिल्ट इन क्रोम कास्ट सपोर्ट उपलब्ध असून MEMC सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यामुळे स्मूथ फ्रेम रेट ऑफर करण्यासाठी मदत होते. या तिन्हीही Smart TV मध्ये डॉल्बी ऍटमॉस सर्टिफिकेशन सह 76w pro स्पीकर देण्यात आले आहे. या स्पीकरच्या माध्यमातून अप्रतिम साऊंड एक्सपिरीयन्स मिळतो. त्यासाठी स्पीकर मध्ये ड्युअल ऍम्प्लिफायर आणि ड्युअल ट्विटर डिझाईन देण्यात आले आहे.

Acer H Pro TV Series Remote फीचर्स –

Acer H Pro TV Series च्या Smart TV मध्ये २ GB रॅम आणि 16 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. यासोबतच इंटरनेटसाठी ड्युअल बँड वायफाय, इतर इथरनेट सपोर्ट उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील यामध्ये उपलब्ध आहे. या Smart TV सोबत उपलब्ध करण्यात आलेला रिमोट मध्ये व्हॉइस कंट्रोल सपोर्ट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर गुगल असिस्टंट यासाठी एक स्पेशल बटन रिमोट मध्ये देण्यात आले आहे. याशिवाय नेटफ्लिक्स, युट्यूब, ऍमेझॉन प्राईम, DISNEY +, हॉटस्टार या सर्व ऑप्शन साठी रिमोट मध्ये वेगवेगळे बटन उपलब्ध आहे.