Acer Nitro V16 : Acer ने लाँच केला Nitro V16 गेमिंग लॅपटॉप; AI सपोर्टसह उपलब्ध  

टाइम्स मराठी । Laptop निर्माता कंपनी Acer ने मार्केटमध्ये गेमिंग लॅपटॉप लॉन्च केला आहे. Acer Nitro V16 असे या या लॅपटॉपचे नाव आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या गेमिंग लॅपटॉप मध्ये AMD चा RYZEN 8040 सिरीज प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने लॉन्च केलेला हा लॅपटॉप 83,775 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. हा लॅपटॉप 2024  मध्ये एप्रिल महिन्यात काही देशांमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल. परंतु भारतामध्ये हा लॅपटॉप केव्हा लॉन्च करण्यात येणार आहे याबद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. आज आपण जाणून घेऊया या लॅपटॉपचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

 स्पेसिफिकेशन

Acer Nitro V16 या गेमिंग लॅपटॉप मध्ये 16 इंच  डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 165 hz रिफ्रेश रेटऑफर करतो आणि 3 ms रिस्पॉन्स टाईम देखील प्रोव्हाइड करतो. या लॅपटॉप मध्ये WQXGA आणि WUXGA हे दोन रिझॉल्युशन ऑप्शन मिळतात. त्यानुसार 2560×1600 पिक्सल रिझोल्युशन असलेला डिस्प्ले किंवा 1920×1200 पिक्सल रिझोल्युशन असलेला डिस्प्ले मिळेल. हा गेमिंग लॅपटॉप AMD च्या RYZEN 8040 CPU वर बेस्ड आहे.

AI सपोर्ट फीचर उपलब्ध– Acer Nitro V16

Acer Nitro V16 मध्ये AI सपोर्ट फीचर देण्यात आले आहे. ज्यामध्ये वेबकॅमचे AI सपोर्ट ACER PURIFIEDVIEW आणि ACER PURIFIEDVOICE 2.0 हे फीचर्स मिळतात. यासोबतच आवाज कमी करणारी टेक्नॉलॉजी असलेले तीन मायक्रोफोन देखील मिळतात.  हा लॅपटॉप Acer Nitro V16 स्पीकर सह येतो. ज्यामुळे क्लियर ऑडिओ ऐकू येण्यास मदत होते. आणि  हे स्पीकर  DTS X अल्ट्रा टेक्नॉलॉजी वर बेस्ड आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

या लॅपटॉप मध्ये नायट्रोसेन्स युटीलिटी अँपचा वापर केल्यामुळे लॅपटॉपचे टेंपरेचर कंट्रोल करता येऊ शकते. यामध्ये कनेक्टिव्हिटी साठी WIFI कनेक्टिव्हिटी पोर्टची पूर्ण सिरीज, फंक्शन USB 4 TYPE C, 2 USB 3 PORT, 1 HDMI PORT, मायक्रो SD कार्ड रीडर यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.