Aditya-L1 Mission : 4 महिन्यात 15 लाख KM चा प्रवास; ISRO कसा करणार सूर्याचा अभ्यास?

टाइम्स मराठी । Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंग नंतर भारत वेगवेगळ्या मिशनची तयारी करत आहे. या मिशन पैकी एक म्हणजे आदित्य L1 मिशन. आदित्य L1 हे मिशन (Aditya-L1 Mission) भारताचे पहिले सूर्य मिशन असणार आहे. म्हणजेच आता इस्त्रो चंद्रानंतर आता सूर्यावर आपले यान पाठवणार आहे. चंद्रावर विक्रम लॅन्डरने सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यात होणाऱ्या सात अंतराळ मोहिमा बद्दल माहिती दिली होती. त्यापैकी एक मोहीम म्हणजेच सूर्य यान. सूर्य यानावर जाण्यासाठी आदित्य एल 1 मिशनची तयारी वैज्ञानिकांकडून अंतिम टप्प्यात सुरू आहे. यानुसारच हे मिशन 2 सप्टेंबरला 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून लॉन्च करण्यात येणार आहे.

   

आदित्य एल 1 हे इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातुन लॉन्च करण्यात येणार आहे. या केंद्रात असलेल्या पीएसएलव्ही एक्सएल PSLV XL या रॉकेट च्या माध्यमातून हे लॉन्च करण्यात येईल. आदित्य एल1 हे पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर लॅंगरेज प्वाईन्ट पर्यंत जाईल. या लँगरेज प्वाइन्ट वरूनच या मिशनचे नाव L1 पडले आहे.

काय असेल यानाचा रूट – (Aditya-L1 Mission)

आदित्य एल 1 हे पीएसएलव्ही एक्सएल PSLV XL C57 या रॉकेट च्या माध्यमातून लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येईल. त्यानंतर आदित्य एल वन ची कक्षा जास्त अंडाकार बनवण्यात येईल. त्यानंतर ऑन बोर्ड प्रोफेशनलचा वापर करून अंतरिक्ष यान L1 बिंदू कडे नेण्यात येईल. एल वन बिंदूकडे घेऊन जात असताना अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षेत्राच्या बाहेर निघेल. आणि त्यानंतर आदित्य एल वन चे क्रूज फेज स्टार्ट होईल. या फेज मध्ये अंतराळयान L1 प्वाइन्ट च्या चारही बाजूंनी Halo Orbit मध्ये फिरताना दिसेल.

काय आहे मिशनचे उद्देश –

श्रीहरीकोटा येथून 2 सप्टेंबरला लॉन्चिंग करण्यात आल्यानंतर आदित्य L1 हे लैंगरेज (Aditya-L1 Mission) प्वाइन्ट पर्यंत पोहोचण्यासाठी चार महिने लागतील. या मिशनच्या माध्यमातून आदित्य L1 हे सूर्याच्या बाहेरील तापमान 10 लाख डिग्री पर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकते याचा शोध लावेल. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे 6000 डिग्री एवढे असते. चंद्रयान मोहीम सुरू असतानाच इस्त्रोकडून आदित्य एल 1 या मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली होती. सूर्याचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी हे मिशन राबवण्यात येणार आहे.