Aditya-L1 Mission : आज ISRO सूर्यावर यान पाठवणार; काय आहे वेळ आणि कस पहाल थेट प्रक्षेपण?

टाइम्स मराठी । चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यात होणाऱ्या मोहिमा बद्दल माहिती दिली होती भविष्यात सात मोहिमा होणार असल्याचा देखील त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार आता शनिवारी म्हणजेच आज भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे सूर्याभ्यास मोहीम सुरू होणार आहे. आपल्या ब्रम्हांडाची निर्मिती असंख्य तारांपासून बनलेली असून वैज्ञानिकांना ब्रह्मांडाच्या भविष्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे सौरमालेतील सूर्याचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचे आहे. आज ISRO आपले यान (Aditya-L1 Mission) सूर्यावर पाठवणार असून संपूर्ण देशाचे लक्ष्य त्याकडे लागलं आहे.

   

किती वाजता होणार लॉन्चिंग– (Aditya-L1 Mission)

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 हे इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातुन लॉन्च करण्यात येणार आहे. या केंद्रात असलेल्या पीएसएलव्ही एक्सएल PSLV XL या रॉकेट च्या माध्यमातून हे लॉन्च करण्यात येणार असून आदित्य एल वन मिशनच्या लॉन्चिंग पूर्वी 30 ऑगस्टला चाचणी करण्यात आली. 2 सप्टेंबर म्हणजेच आज 11 वाजून 50 मिनिटांनी हे यान लॉन्च करण्यात येणार आहे. आदित्य एल वन च्या कक्ष पर्यंतचा प्रवास हा सुमारे 125 दिवसांचा असणार आहे. असे इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं.

असा असेल प्रवास

आदित्य एल1 (Aditya-L1 Mission) हे पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर लॅंगरेज प्वाईन्ट पर्यंत जाईल. या लँगरेज प्वाइन्ट वरूनच या मिशनचे नाव L1 पडले आहे. आदित्य एल 1 हे पीएसएलव्ही एक्सएल PSLV XL C57 या रॉकेट च्या माध्यमातून लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येईल. त्यानंतर आदित्य एल वन ची कक्षा जास्त अंडाकार बनवण्यात येईल. त्यानंतर ऑन बोर्ड प्रोफेशनल चा वापर करून अंतरिक्ष यान L1 बिंदू कडे नेण्यात येईल. एल वन बिंदूकडे घेऊन जात असताना अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर निघेल. आणि त्यानंतर आदित्य एल वन चे क्रूज फेज स्टार्ट होईल. या फेज मध्ये अंतराळयान L1 प्वाइन्ट च्या चारही बाजूंनी Halo Orbit मध्ये फिरताना दिसेल.

लॉन्चिंग नंतर काय

श्रीहरीकोटा येथून आज लॉन्चिंग करण्यात आल्यानंतर आदित्य L1 ला लैंगरेज प्वाइन्ट पर्यंत पोहोचण्यासाठी चार महिने लागतील. या मिशनच्या माध्यमातून आदित्य L1 हे सूर्याच्या बाहेरील तापमान 10 लाख डिग्री पर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकते याचा शोध लावेल. चंद्रयान मोहीम सुरू असतानाच इस्त्रोकडून आदित्य एल 1 या मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली होती. सूर्याचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी हे मिशन राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सूर्याच्या अभ्यासासाठी उपग्रह पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल.

कुठे पाहणार थेट प्रक्षेपण ?

सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात येणारे आदित्य एल वन हे मिशन (Aditya-L1 Mission) आज लॉन्च होणार असून तुम्ही या क्षणाचा आनंद लाईव्ह प्रक्षेपण पाहून घेऊ शकतात. आदित्य एल वन हे मिशन दूरदर्शन, फेसबुक चॅनल, इस्त्रो चे यूट्यूब चैनल यावर ऑनलाईन पाहू शकतात. सध्या या लॉन्चिंग साठी वेबसाईटवर काउंट डाऊन सुरू झाला आहे.