Aditya L1 ने काढला पृथ्वी आणि चंद्राचा सेल्फी; ISRO ने शेअर केला खास व्हिडिओ

टाइम्स मराठी । चांद्रयान मिशनच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर इस्रोकडून सूर्याच्या अभ्यासासाठी Aditya L1 हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. 2 सप्टेंबरला Aditya L1 हे मिशन यशस्वीरित्या अवकाशात पाठवण्यात आले. त्यानंतर ISRO कडून सतत वेगवेगळे अपडेट शेअर करण्यात आले. आता नुकताच आणखीन एक अपडेट दिले आहे. इस्त्रोने दिलेला हा अपडेट ट्विटर हँडल वरून शेअर करण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून इसरोने Aditya L1 ने काढलेल्या सेल्फीची माहिती दिली.

   

ISRO ने ट्विटर हँडल वरून शेअर केलेल्या या व्हिडिओ मध्ये Aditya L1 ने काढलेला सेल्फी व्हिडिओ मध्ये पृथ्वी आणि चंद्राचा व्हिडिओ दिसत आहे. एवढेच नाही तर Aditya L1 वरील VELC आणि SUIT हे पेलोड देखील या सेल्फी मध्ये दिसत आहे. सध्या आदित्य एल वन हा पृथ्वीच्या बाहेर कक्षेत असून 18 सप्टेंबर पर्यंत पृथ्वीभोवती फेरी मारेल . त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून L1 पॉईंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागणार असून L 1 हा असा पॉईंट आहे जिथे पृथ्वी आणि सूर्याचा गुरुत्वाकर्षण जाणवत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेली वस्तू स्थिर राहते. म्हणूनच या पॉईंटची निवड करण्यात आली.

2 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आले Aditya L1-

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 हे इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातुन 2 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आले होते. या मिशनच्या माध्यमातून आदित्य L1 हे सूर्याच्या बाहेरील तापमान 10 लाख डिग्री पर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकते याचा शोध लावणार आहे. चंद्रयान मोहीम सुरू असतानाच इस्त्रोकडून आदित्य एल 1 या मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली होती. सूर्याचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी हे मिशन राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सूर्याच्या अभ्यासासाठी उपग्रह पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला .

आदित्य एल1 हे पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर लॅंगरेज प्वाईन्ट पर्यंत जाईल. या लँगरेज प्वाइन्ट वरूनच या मिशनचे नाव L1 पडले आहे. आदित्य एल 1 हे पीएसएलव्ही एक्सएल PSLV XL C57 या रॉकेट च्या माध्यमातून लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येईल. आदित्य एल वन ची कक्षा जास्त अंडाकार बनवण्यात येईल. त्यानंतर ऑन बोर्ड प्रोफेशनल चा वापर करून अंतरिक्ष यान L1 बिंदू कडे नेण्यात येणार आहे. L 1 बिंदूकडे घेऊन जात असताना अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर निघेल. आणि त्यानंतर आदित्य एल वन चे क्रूज फेज स्टार्ट होईल. या फेज मध्ये अंतराळयान L1 प्वाइन्ट च्या चारही बाजूंनी Halo Orbit मध्ये फिरताना दिसेल.