टाइम्स मराठी । चांद्रयान मिशनच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर इस्रोचं आदित्य L 1 हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 हे इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातुन 2 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर इस्रो कडून सतत वेगवेगळे अपडेट (Aditya L1 Update) शेअर करण्यात आले. आता नुकताच आणखीन एक अपडेट दिले आहे. आदित्य एलवन स्पेस क्राफ्ट ने चौथे अर्थ ब्राऊन ऑर्बिट मॅन्युव्हर यशस्वीपणे पूर्ण केले आहे. याबाबत इस्रोने ट्विट करत माहिती दिली.
याबाबत इस्रोने ट्विटरवर पोस्ट करून सांगितले की, फोर्थ अर्थ बाउंड मॅन्युव्हर (EBN#4) यशस्वी झाले आहे. इस्रोच्या मॉरिशस बंगलोर श्रीहरिकोटा या ठिकाणी असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटर आणि पोर्ट ब्लेअर मधील ग्राउंड स्टेशनच्या माध्यमातून हे अपडेट घेण्यात आले. अर्थ ब्राऊन ऑर्बिट मॅन्युव्हर म्हणजे पृथ्वी भोवती फिरताना गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून स्पेस मधील प्रवासासाठी स्पीड जनरेट करणे.आदित्य एल वन साठी फिजी बेटावरील ट्रान्सपोर्ट टेबल टर्मिनल पोस्ट बर्न ऑपरेशन साठी मदत करणार असल्याचे देखील ट्विटर मध्ये सांगितलं. आदित्य L-1 स्पेसक्राफ्ट 256 किमी x 121973 किमी अंतरावर आहे. पुढील मॅन्युव्हर ट्रान्स- लॅग्रीजीयन पॉईंट 1 इंसर्शन TL1I हे 19 सप्टेंबरला मध्यरात्री दोन वाजता पाहता येईल. असं इस्रोने ट्विटर वरून सांगितलं.
आदित्य एलवन चे पहिले दुसरे आणि तिसरे अर्ध ब्राउंड मॅन्यूव्हर 3 सप्टेंबर 5 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबरला यशस्वीरित्या पूर्ण झाले. आता इस्रोचे स्पेसक्राफ्ट 16 दिवस पृथ्वी भोवती फिरणार आहे. यावेळी पुढील प्रवासासाठी आवश्यक वेग प्राप्त करण्यात येईल. पाचवे अर्थ ब्राऊन मॅन्यूव्हर यशस्वी झाल्यानंतर आदित्य एल वन हे मिशन 110 दिवसांच्या प्रवासासाठी लॅग्रेज पॉईंट कडे प्रवास करेल. आणि यामुळे अंतराळ यातील सूर्याचे हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल.
आदित्य L1 सोबत बऱ्याच प्रकारची उपकरणे पाठवण्यात आलेत. यामध्ये सोलर प्लेयर्स, कोरोनल मास इंजेक्शन यासारख्या गोष्टींचा अभ्यास आदित्य L1 करणार आहे. आदित्य एल1 हे पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर लॅग्रेज प्वाईन्ट पर्यंत जाणार आहे. सूर्य आणि पृथ्वी या दोघांमध्ये पाच लॅग्रेज पॉईंट आहेत. हा लॅग्रेज पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणावरून सूर्याचे कोणतेही ग्रहण अडथळ्याशिवाय पाहणे शक्य होईल असा पॉईंट.