आता Whatsapp वर दिसतील जाहिराती; कंपनीला होणार मोठा फायदा

टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेजिंग ॲप च्या माध्यमातून चॅटिंगचा अनुभव अप्रतिम झाला आहे. युजर्सला अप्रतिम एक्स्पिरियन्स मिळावा यासाठी मेटाकडून Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट करण्यात येत आहे. जेणेकरून ग्राहकांना या फीचर्सच्या माध्यमातून फायदा होईल. Whatsapp ने ऑडिओ कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग, चॅनेल, अवतार, HD फोटो, ब्रॉडकास्ट लिस्ट, यासारखे बरेच फीचर्स लॉन्च केले आहे. त्याचप्रकारे Whatsapp च्या काही फीचर्स वर काम देखील सुरू आहे. या फीचर्सचा वापर करून ग्राहकांना अप्रतिम अनुभव मिळत आहे. आता कंपनीकडून एका नवीन फीचरवर काम सुरू आहे. हे नवीन फीचर कंपनीसाठी रेवेन्यू सोर्स प्रमाणे काम करेल. म्हणजेच आता Whatsapp स्टेटस मध्ये  तुम्हाला ऍड दिसू शकतात.

   

Whatsapp चे प्रमुखांनी दिली माहिती

व्हाट्सअँप युजर्स वेगवेगळे स्टेटस ठेवत असतात. हे स्टेटस कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींना दिसतात. आता या स्टेटस मध्ये जाहिराती बघायला मिळू शकतात. या फीचरच्या माध्यमातून कंपनीला फायदा होणार आहे. हे फीचर चॅनल्स मध्ये देखील उपलब्ध करण्यात येऊ शकते. या काम सुरू असलेल्या फीचर्स बद्दल  Whatsapp चे प्रमुख, विल कॅथर्ड यांनी ब्राझीलियाइ मीडियाला इंटरव्यू देताना सांगितले. यावेळी त्यांनी मेसेजिंग ॲप वर ऍड  उपलब्ध करण्याची योजना असल्याचे म्हंटल.

Whatsapp स्टेटस मध्ये दिसतील ऍड्स

व्हाट्सअँप च्या प्रायमरी चॅट इनबॉक्स मध्ये ऍड उपलब्ध करण्यात येणार नसून या ऍड्स चॅनल आणि व्हाट्सअप स्टेटस मध्ये उपलब्ध होतील. ज्याप्रमाणे इन्स्टा स्टोरीवर एड्स दाखवल्या जातात त्याचप्रमाणे व्हाट्सअप वर देखील जाहिराती दिसतील. त्याचबरोबर कंपनीकडून चॅनल सबस्क्रीप्शन साठी फीस देखील आकारली जाऊ शकते. हे सबस्क्रिप्शन अशा युजर साठी उपलब्ध होईल जे एक्सेस साठी पेमेंट करतात.

अजून टेस्टिंग सुरू करण्यात आली नाही

मेटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सध्या तरी स्टेटस एड्स बद्दल कोणती टेस्टिंग सुरू करण्यात आलेली नाही. 2012 मध्ये फेसबुक ने इंस्टाग्राम विकत घेतल्यानंतर ऍड सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता फेसबुक इंस्टाग्राम नंतर व्हाट्सअप वर देखील एड्स मिळू शकतील. या सोबतच सबस्क्रीप्शन प्लॅन्स देखील उपलब्ध करण्यात येण्याची शक्यता आहे. नुकतच मार्क झुकेरबर्ग यांनी  ट्विटर विदाऊट एड्स  वापरण्यासाठी 19 बिलियन डॉलर सबस्क्रीप्शन कॉस्ट ठेवली आहे.