पहिल्यांदाच उपग्रह पृथ्वीवर उतरणार; 5 वर्षांपूर्वी केलं होत लाँच

टाइम्स मराठी | युरोपीय स्पेस एजन्सीने 2018 मध्ये एक सॅटॅलाइट लॉन्च केले होते. या सॅटेलाईट च नाव आयोलस( Aeolus) आहे. हे सॅटॅलाइट पृथ्वी एक्सप्लोरर शोध मोहीम म्हणून लॉन्च करण्यात आले होते. निकामी झालेले सॅटेलाइट या Aeolus च्या मदतीने नियोजित पद्धतीने पृथ्वीवर परत पाठवले जात आहेत. या मिशनमुळे सॅटॅलाइट्स ला पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

   

28 जुलै पर्यंत सॅटेलाईट पृथ्वीवर येणार-

युरोपिय स्पेस एजन्सी चे Aeolus हे सॅटॅलाइट 320 km अंतरावरून पृथ्वीवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 19 जूनला हे मिशन पूर्ण झाले असून सॅटेलाईट पृथ्वीच्या दिशेने येत आहेत. 24 जुलै पर्यंत या सॅटेलाईटने 280 किलोमीटर पर्यंत प्रवास पूर्ण केला असून 28 जुलै पर्यंत हे सॅटॅलाइट पृथ्वीवर पोहोचू शकते. हे सॅटॅलाइट पृथ्वीवर सुरक्षितपणे पोहोचावे यासाठी युरोपीय स्पेस एजन्सी प्रयत्न करत आहे. यासाठी ऑपरेटर्स मार्गदर्शन करणार आहेत.

अटलांटिक महासागरामध्ये उतरणार सॅटेलाईट-

हे सॅटेलाईट पृथ्वीवर अटलांटिक महासागरामध्ये उतरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण पृथ्वीवर उतरवत असताना बरेच सॅटॅलाइट हवेच्या संपर्कात आल्यामुळे जळतात. त्यामुळे त्यांचे तुकडे विभागू शकतात. अटलांटिक महासागरामध्ये जास्त दृश्यमानता असल्यामुळे त्या ठिकाणी हे सॅटेलाईट सोडणे नुकसानदायक राहणार नाही. त्याचबरोबर या योजनेनुसार सुरळीत पार पडल्यास कोणताही धोका उद्भवणार नाही.

युरोपियन स्पेस एजन्सीने यापूर्वी देखील ही मोहीम राबवली होती. 5 वर्षांपूर्वी 1360 किलोग्राम चे हे सॅटेलाईट लॉन्च करण्यात आले होते. त्यावेळी 320km उंचीवरून सॅटेलाईट पृथ्वीला चक्कर मारत होते. बाकीच्या ग्रहा भोवती फिरणाऱ्या वाऱ्याचा वेग मोजणे हे या सॅटेलाईटचा उद्धेश होता. पण पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत टिकून राहण्यासाठी या Aeolus सॅटेलाईटला जास्त फ्युल खर्च करावा लागत होतं. त्याचबरोबर ग्रीक पौराणिक गोष्टीमध्ये वाऱ्याच्या रक्षकाला Aeolus या नावाने ओळखले जात होतं. त्यामुळे या सॅटेलाईटचं नाव Aeolus सॅटेलाईटला ठेवण्यात आलं असावं. या सॅटेलाईट ला तीन वर्षांसाठी पाठवण्यात आलं होतं. पण आता पाच वर्षे पूर्ण झाले असून या सॅटेलाईट मध्ये लागणारे इंधन इंधन तेजीने संपत आहे.