Yamaha ने लॉन्च केले Aerox 155 चे Moto GP एडिशन; E20 इंधनावरही धावते

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेमध्ये Yamaha Motors प्राइवेट लिमिटेडने Aerox 155 चे Moto GP लॉन्च केले आहे. या स्पेशल स्कूटर एडिशनच कंपनीकडून मोजकेच प्रॉडक्ट विकले जाणार आहे.  Aerox 155 च्या स्पेशल Moto GP एडिशनची एक्स-शोरूम कीमत 1.48 लाख रुपये एवढी असून 4 कलर ऑप्शन मध्ये विक्री करण्यात येणार आहे. कंपनीकडून या स्कुटरमध्ये बरेच फीचर उपलब्ध करण्यात आले असून डॅशिंग आणि स्पोर्टी लुकमध्ये ही स्कूटर खूपच आकर्षक दिसत आहे. आज आपण या Aerox 155 च्या Moto GP एडिशनचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

डिझाईन

Yamaha Aerox 155 ही स्कूटर Moto GP प्रमाणे डेव्हलप करण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्कूटरला Moto GP ब्रँडिंग प्रमाणे ऑल ब्लॅक कलर स्किममध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या एडिशन स्कूटरच्या स्पोर्टी फ्रंट एप्रनमध्ये नवीन ग्राफिक्स उपलब्ध करण्यात आले आहे. हे नवीन ग्राफिक्स Moto GP च्या रेस मॉडेलमध्ये उपलब्ध करण्यात आले होते.

स्पेसिफिकेशन

Yamaha Aerox 155 Moto GP एडिशनमध्ये 155cc इंजिन देण्यात आले आहे. या गाडीमध्ये ब्ल्यू कोर लिक्विड कुल्ड इंजिन असून यामध्ये व्हेरिएबल वॉल्व एक्च्युएशन VVA प्रदान करण्यात आले आहे. हे इंजन 8,000 rpm वर 14.79 bhp  पावर आणि 6,500 rpm वर 13.9Nm पीक टॉर्क जेनरेट करते. त्याचबरोबर हे इंजिन E20 फ्यूलला सपोर्ट करते. म्हणजेच ही इथेनॉल वर चालणारी  स्कूटर आहे. यानुसार तुम्ही या स्कूटरमध्ये 80 टक्के पेट्रोल आणि 20% इथेनॉल मिक्स करू शकतात. हे इंजन सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सुसज्ज करण्यात आले आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Yamaha Aerox 155 Moto GP एडिशनमध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी, ऑल-एलईडी सेटअप आणि बॉडी-कलर्ड 14-इंच अलॉय व्हील उपलब्ध करण्यात आले आहे. ही स्कूटर मेटैलिक ब्लैक, रेसिंग ब्लू, ग्रे वर्मिलियन आणि सिल्वर या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये  ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स सिस्टम देखील उपलब्ध केली आहे.

अन्य फिचर्स

Yamaha Aerox 155 Moto GP एडिशनमध्ये LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ड्युअल चॅनल ABS, फ्रंट आणि रियल साईड मध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये क्लास डी हेडलॅम्प देखील उपलब्ध आहे. या हेडलॅम्पमुळे रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्स करत असताना अप्रतिम लाईट मिळेल. एवढेच नाही तर या स्कूटरमध्ये रायडर सेक्युरिटी साठी ट्रॅक्शन कंट्रोल देखील उपलब्ध आहे.