अंजुनंतर आणखी एका तरुणीने प्रियकरासाठी गाठलं पाकिस्तान; Snapchat वर झालं प्रेम

टाइम्स मराठी | सोशल मीडिया, फेसबुक इंस्टाग्राम, पबजी गेमिंग अँप च्या माध्यमातून प्रेम प्रकरण काही दिवसापासून उघड होत आहेत. त्याचबरोबर या घटनांमधून काहीजण पाकिस्तान वरून भारतात तर काहीजण भारतातून पाकिस्तानात जाण्याची हिंमत करताना दिसत आहेत. अशातच तुम्ही अंजू प्रकरण ऐकलं असेल. राजस्थान येथील अंजु आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तान ला गेली आहे. ही घटना ताजी असतानाच आता अंजू नंतर एक चिनी तरुणी चीन मधून पाकिस्तानला प्रियकराला भेटण्यासाठी गेली आहे.

   

तरुणी जावेद नावाच्या पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात-

ही चिनी तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी खैबर पखतूनख्वा येथील खालच्या दीर जिल्ह्यात पोहोचली आहे. यामुळे आज काल कोणाला कशाच्या माध्यमातून प्रेम होईल आणि कोण कुठे जाईल याचा नेम नाही. चीन मधल्या या तरुणीचं नाव सून गाओ फेंग असल्याचं सांगण्यात येत आहे. 20 वर्षीय ही तरुणी 18 वर्षाच्या जावेद नावाच्या पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडली. एवढेच नाही तर या मुलीने पाकिस्तानात जाऊन आता इस्लाम धर्म कबूल केल्याची माहिती मिळत आहे. जावेद हा खैबर पखतूनख्वा येथील बाजोर जिल्ह्यातील रहिवासी असून लोवर दीर या ठिकाणी त्याच्या काका जवळ राहतो. आता हे दोघं लग्नाची प्लॅनिंग करत असल्याची माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानी मीडिया कडून मिळालेल्या माहितीनुसार, गाओ फेंग ही तरुणी तीन महिन्यांच्या वलिड टुरिस्ट विजा वर लोवर दीर येथील समर बाग या परिसरात आली आहे. पोलिसांनी याबद्दल चौकशी केली असता, लोअर दीर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी जियाउद्दीन यांनी सांगितलं की, या चिनी तरुणीला सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्याचबरोबर सुरक्षेमुळे तिच्या फ्रीडम वर देखील बंधन घालण्यात आले होते. त्याचबरोबर डीपी ओ यांनी माहिती दिली की, जावेद आणि फेंग स्नॅपचॅट वर भेटले होते. तीन वर्षे एकमेकांच्या संपर्कात होते. पाकिस्तानातील खैबर पखतूनख्वा या ठिकाणी येण्यापूर्वी या चिनी तरुणीने गिलगिट बाल्टीस्थान या ठिकाणी प्रवास केला.

प्रेम प्रकरणात सातत्याने वाढ-

पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर, भारतातून पाकिस्तानला फेसबुक फ्रेंड ला भेटायला गेलेली अंजू नंतर आता अजून एक घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या घटना काही दिवसांपासून सतत घडत आहे. अंजूने देखील भेटायला गेलेल्या फेसबुक फ्रेंड सोबत निकाह केल्याचं उघड झालं आहे. अंजू ही राजस्थानला राहत होती. ती पाकिस्तान मध्ये खैबर पखतूनख्वा येथील वरच्या दीर जिल्ह्यात पोहोचली तर आता ही चिनी तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी खैबर पखतूनख्वा येथील खालच्या दीर जिल्ह्यात पोहोचली आहे. यामुळे आज काल कोणाला कशाच्या माध्यमातून प्रेम होईल आणि कोण कुठे जाईल याचा नेम नाही.