भारत रचणार आणखीन एक नवा इतिहास! चांद्रयान 3 नंतर आता समुद्रयान मोहिमेला सुरुवात

TIMES MARATHI | चांद्रयान 3 ने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश बनला आहे. चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रयान तीनच्या यशानंतर आणखीन सात मिशन लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार भारत फक्त आता अंतराळातील उंची गाठणार नसून समुद्राच्या खोलवर जाऊन पृथ्वीवरील बरेच रहस्य भारत शोधून काढणार आहे. म्हणजेच आता समुद्रयान हे मिशन देखील भारत लॉन्च करणार आहे.

   

समुद्रयान मिशन

समुद्र यान हे मिशन पहिले मानव मिशन असेल. या मिशनच्या माध्यमातून समुद्राच्या खोलवर पाणबुडी च्या साह्याने 6000 मीटर खोलवर मानव पाठवण्यात येणार आहे. समुद्राच्या खोलवर असलेले संसाधने धातू खनिज कोबाल्ट निकल मॅग्नीज या सर्व गोष्टींचा शोध घेण्याच्या उद्देशाने हे मिशन लॉन्च करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पेशल पाणबुडी तयार करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टने दिलेला माहितीनुसार, 2026 पर्यंत समुद्र या मिशन सुरू होणार असल्याची शक्यता आहे. समुद्राच्या खोलीवर जाणाऱ्या सबमसिरबल वाहनाचे नाव मत्स्य 6000 असणार आहे. ही पाणबुडी दोन वर्षापासून डेव्हलप करण्यात येत असून आता ही पाणबुडी समुद्र चाचण्यांसाठी पूर्णपणे तयार आहे. 2024 मध्ये या वेहिकलची चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मत्स्य 6000 हे वेगवेगळ्या फेजमध्ये तयार करण्यात येत आहे. हे मिशन चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी यांनी डिझाईन केले आहे. त्याचबरोबर या इन्स्टिट्यूटने बऱ्याच प्रकारचे अंडरवॉटर इन्स्ट्रुमेंट तयार केले आहे. या इन्स्ट्रुमेंट मध्ये ऑटोनॉमस कोरिंग सिस्टीम, ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल, डीप सी मायनिंग सिस्टीम हे सर्व इन्स्ट्रुमेंट डिझाईन केले आहे. राष्ट्रीय महासागर प्रौद्योगिकी संस्थान NIOT च्या वैज्ञानिकांनी मत्स्य 6000 या पाणबुडीची पूर्णपणे तपासणी केली. या तपासणीवेळी यामध्ये डिझाईन, मटेरियल, परीक्षण, प्रमाणन, मानक, प्रोटोकॉल या सर्वांचा विचार करण्यात आला. यापूर्वी 8 जून 2023 ला विना मानव समुद्रयान मानव रहित मिशन पूर्ण करण्यात आले आहे. हे मिशन 7000 मीटर खोल सोडण्यात आले होते. आता पहिल्यांदा समुद्र या मिशनमध्ये तीन मानव पाठवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय महासागर प्रौद्योगिकी संस्थान NIOT चे संचालक जी ए रामदास यांनी सांगितलं की, समुद्र यानासाठी तयार करण्यात आलेले मत्स 6000 ही पाणबुडी 2.1 मीटर व्यास एवढी गोल असून यामध्ये तीन प्रवासी सहज बसू शकतात. हे 80 मिमी जाड टायटॅनियम मिश्र धातूपासून बनवण्यात आले आहे. त्यामुळे सहाशे वेळा दबाव पडला तरी या पाणबुडीला काहीच फरक पडत नाही. एवढेच नाही तर ही पाणबुडी 12 ते 16 तासांपर्यंत ऑपरेट करू शकेल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे.