Agni 1 Missile : भारताचे कमी रेंज असलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र Agni 1 चे ट्रेनिंग लॉंचिंग काल म्हणजेच 7 डिसेंबरला यशस्वी ठरले. ते ओडिशाच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रक्षेपित करण्यात आले होते. याबाबत संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. AGNI 1 ट्रेनिंग लॉन्च स्ट्रॅटेजी फोर्सेस कमांडच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या ट्रेनिंगलॉन्च चे सर्व ऑपरेशनल आणि टेक्निकल मापदंड यशस्वीरित्या प्रमाणित करण्यात आले.
Agni 1 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रेंज मध्यम स्वरूपाची आहे म्हणजेच ही रेंज 700 km पर्यंत आहे. आणि या क्षेपणास्त्राचे वजन 12 टन एवढे आहे. हे क्षेपणास्त्र 1000 किलो अण्वस्त्र घेऊन जाऊ शकते. Agni 1 या क्षेपणास्त्राला अत्याधुनिक सिस्टीम प्रयोगशाळा, संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि रिसर्च सेंटर यांनी डेव्हलप केले आहे. यापूर्वी जून महिन्यात याच लॉंचिंग स्थळावरून Agni 1 क्षेपणास्त्राचे लॉंचिंग करण्यात आले होते.
एवढी आहे या क्षेपणास्त्राची मारक क्षमता – Agni 1 Missile
Agni 1 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ट्रेनिंग लॉन्चिंग बद्दल संरक्षण मंत्रालय यांनी सांगितलं की, Agni 1 ही एक सिद्ध उच्च अचूकता क्षेपणास्त्र प्रणाली आहे. यासोबतच या क्षेपणास्त्राची स्टेटस कमांडच्या संरक्षणाखाली आयोजित करण्यात आलेल्या वापरकर्ता ट्रेनिंग लॉन्चने सर्व ऑपरेशनल आणि टेक्निकल बाबींची यशस्वीपणे तपासणी केली आहे. Agni 1 Missile ची मारक क्षमता 700 किलोमीटर आणि 1000 किलो अण्वस्त्र वाहून नेण्यास आहे.
मागच्या वर्षी करण्यात आले होते Agni 5 चे परीक्षण
Agni 1 सिरीजचे बरेच क्षेपणास्त्र भारताने विकसित केले आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात परमाणु क्षमता असलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र AGNI 5 जे यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. हे क्षेपणास्त्र 5000 किलोमीटर पर्यंत टारगेटला निशाणा बनवू शकते.
अग्नि प्राईम डेव्हलपिंग सुरू
Agni 1 Missile ची आणखीन प्रगत आवृत्ती अग्निप्राईम सध्या डेव्हलप करण्यात येत आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 2021 जून मध्ये घेण्यात आली होती. यामध्ये Agni 1 द्रवइंधन प्रणोदन प्रणालीच्या तुलनेत दोन स्टेज सॉलिड इंधन प्रणोदन प्रणाली आहे. यामुळे क्षेपणास्त्राची लॉन्चिंग सहजरीत्या होऊ शकते.