AI ने घडविला महादेवांच्या तांडवाचा अद्भुत अनुभव; Video पाहून व्हाल थक्क

टाइम्स मराठी । AI मध्ये वेगाने होत चाललेला विकास आधुनिक तंत्रज्ञानासाठी फायदेशीर ठरत आहे. AI आता सर्वच अशक्य गोष्टी शक्य करण्याच्या तयारीत आहे. महत्वाचे म्हणजे, या नविन गोष्टींना लोकांकडून देखील तितकाच प्रतिसाद दिला जात आहे. सध्या 17 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाल्यामुळे भाविकांनी शंकर महादेवाची पुजा अर्चा तसेच श्रावण विधी करण्यास सुरुवात केली आहे. अशा वातावरणात भक्तांना महादेवाचे अद्भुत दर्शन घडवण्याचा प्रयत्न AI ने केला आहे. एआयने आपल्या टूल्सच्या माध्यमातून शंकर भगवान यांचा तांडव करणारा व्हिडिओ तयार केला आहे. एआयने तयार केलेल्या या व्हिडिओत महादेव तांडव करताना दिसत आहे.

   

AI च्या मदतीने व्हिडिओ तयार

शंकर महादेवांचा तांडव धरतीला हलवून ठेवणारा असतो. आजवर आपण महादेवांच्या क्रोधा विषयी आणि त्यांनी केलेल्या तांडवाविषयी अनेकवेळा ऐकत आलो आहोत. मात्र आयने तयार केलेल्या व्हिडिओत शंकर महादेव प्रत्येक्षात तांडव करताना दिसत आहेत. आयकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला भक्तांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. तसेच या व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या कमेंट्स करण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षातच असे वाटेल की, शंकर महादेव वास्तवात उतरून आपल्यासमोर तांडव सादर करीत आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात आशिक सरकार या व्यक्तीने हा शिव तांडव केला आहे.

शिव तांडवांचा अद्भुत अनुभव

मात्र शंकर महादेवांचा हा तांडव करणारा व्हिडिओ AIने आपले आधुनिक टूल्स वापरून तयार केला आहे. या व्हिडिओला Wild Trance नावाच्या इंस्टाग्रापेजवर शेअर करण्यात आले आहे. तसेच, हा व्हिडिओ शेअर करत त्याला, “शिव तांडव, ज्याला अनेकदा शिवाचे सृष्टीसाठी नृत्य” म्हटले जाते, हे हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान शिवाशी संबंधित एक शक्तिशाली आणि प्रतिष्ठित नृत्य आहे.जतन, संरक्षण आणि विनाशाचे प्रतिक मानले जाते. असे मानले जाते की हे नृत्य भगवान शंकर वैश्विक ड्रमच्या तालावर करतात. जे विश्वाच्या शाश्वत लयवर त्यांचे नियंत्रण ठेवतात. शांत आनंद तांडवापासून ते रुद्र तांडवापर्यंत अशा विविध व्याख्या आणि शैली आहेत. हे वैश्विक संतुलन आणि अस्तित्वाच्या गतिशील शक्तींचे गहन प्रतिनिधित्व आहे. ” असे कॅप्शन देण्यात आले आहे.

दरम्यान, Wild Trance पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखोंच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी, शिव तांडवाची प्रत्यक्षात प्रचिती मिळाली असे आपल्या कमेंट्समध्ये म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे एआयने शेअर केलेल्या व्हिडिओत, शंकर महादेवांच्या चेहऱ्यावरील भाव देखील तितक्याच व्यवस्थित रित्या टिपण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ दिसणारे शंकर महादेव हे प्रत्यक्षात समोर तांडव करत असल्यासारखे वाटतात. त्यामुळे एआयने दिलेला हा अद्भुत अनुभव नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.