अचानक येणाऱ्या Heart Attack बाबत आधीच माहिती देणार AI

टाइम्स मराठी । प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, गुगल, स्मार्टफोन ॲप्लिकेशन्स, आयटी कंपन्या या प्रत्येक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजंटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. AI च्या माध्यमातून  कोणतेही काम पटकन करता येते. आता अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी केलेल्या एका वैज्ञानिक रिसर्चमध्ये आर्टिफिशल इंटेलिजंट च्या माध्यमातून हार्ट अटॅक येण्यापूर्वी माहिती मिळणार असल्याचे सांगण्यात आलं.

   

वैज्ञानिकांनी तयार केले AI अल्गोरिदम

ब्रिटिश हार्ट फाउंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्च च्या माध्यमातून फंडेड एडिनबर्ग युनिव्हर्सिटी मध्ये एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्च नुसार AI म्हणजेच आर्टिफिशियल च्या माध्यमातून अचूक पद्धतीने हार्ट अटॅकचा अंदाज लावण्यात येऊ शकतो. यासाठी काही वैज्ञानिकांनी AIअल्गोरिदम तयार केला आहे. या अल्गोरिदमच्या मदतीने अचानक येणाऱ्या हार्ट अटॅक बाबत अगोदरच अंदाज लावला जातो. या अलगोरिदम च्या माध्यमातून AI च्या मदतीने डॉक्टर लवकर हार्ट अटॅक ओळखू शकतात.

AI अल्गोरिदम आहे 99.6% प्रभावी

या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून छातीत त्रास होणाऱ्या हजारो रुग्णांचा जीव वाचू शकतो. जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जाते, तेव्हा त्याचा होणारा प्रभाव किंवा परिणामकारक दर तपासणे गरजेचे असते. आर्टिफिशियल इंटेलिजंट अल्गोरिदम  ही टेक्नॉलॉजी  हार्ट अटॅक ची ओळख करण्यासाठी 99.6% प्रभावी आहे. म्हणजे या  माध्यमातून  एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. यामुळे ह्रदयविकारांच्या रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. हे संशोधन सहा 6 देशातील 10,286 लोकांवर करण्यात आले. त्यानंतर या टेक्नॉलॉजीची अचूकता समजली.