AI अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकाही लढवणार! मस्क यांच्या विधानाने खळबळ

टाइम्स मराठी । सध्या संपूर्ण जगात AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजंटचा वापर केला जात आहे. AI वरून जगात अनेक मतांतरे आहेत . AI मुळे मानवाच्या जीवनाला धोका आहे असं म्हणणारा एक वर्ग आहे तर AI मुळे मानवाचे जीवन सोप्प होईल असं मानणारा एक वर्ग आहे. काहीजण तर असेही म्हणत आहेत की AI मुळे लोकांच्या नोकऱ्या जातील. एकीकडे या सर्व चर्चा सुरु असताना एलोन मस्क यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. एआय केवळ नोकऱ्याच घालवणार नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकाही लढवणार असं मस्क यांनी म्हंटल आहे.

   

10 व्या वार्षिक ब्रेकथ्रू पारितोषिक समारंभात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एलोन मस्क यांनी म्हंटल, AI 2032 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकते. मूलभूत भौतिकशास्त्र, गणित आणि जीवन विज्ञानातील प्रगतीसाठी हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. यावेळी मस्क याना असेही विचारण्यात आलं कि 2024 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक कोण जिंकू शकेल? यावर स्मितहास्य करत मस्कने उलट प्रश्न केला कि तुम्हाला काय वाटत? 32 मध्ये व्हाईट हाऊसची निवडणूक कोणत्या प्रकारचे AI जिंकेल? ट्रान्सफॉर्मर की डिफ्यूजन?”

दरम्यान, यापूर्वी, इलॉन मस्क यांनी देखील AI च्या निवडणुकांवर होणाऱ्या परिणामाबद्दल भाष्य केलं होते. जर एआय पुरेसे स्मार्ट असेल तर ते लोकशाहीला हानी पोहोचवू शकते. एवढच नाही तर 2026 मध्ये एआय मानवापेक्षा हुशार असू शकते, असा अंदाजही एलोन मस्क यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, जर तुम्ही AGI [कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता] ची व्याख्या सर्वात हुशार माणसापेक्षा सुद्धा अधिक हुशार अशी केली, त्यामुळे मला वाटते की ते कदाचित पुढच्या वर्षभरात, दोन वर्षांत होईल.