Air India ची बंपर ऑफर!! फक्त 1470 रुपयांत करा विमानातुन सफर

टाइम्स मराठी । टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने (Air India) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय रूट नेटवर्कवर 96 तासांसाठी एक स्पेशल सेल सुरू केला आहे. या स्पेशल सेलच्या माध्यमातून प्रवाशांना कमी किमतीमध्ये फ्लाईट तिकीट खरेदी करता येऊ शकते. एयर इंडियाने सुरू केलेल्या धमाकेदार ऑफर नुसार तुम्ही ट्रेनच्या किमतीमध्ये विमानाने प्रवास करू शकतात. त्यासाठी एअर इंडिया ने एक खास सेल सुरू केला आहे.

   

Air India ने 17 ऑगस्टला या ऑफरची माहिती दिली होती. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, देशांतर्गत मार्गांवर प्रवाशांना फक्त 1470 रुपयांमध्ये विमानाचे तिकीट मिळू शकते. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी देखील विमानांची तिकिटे स्वस्त करण्यात आली आहे. परंतु एयर इंडिया ने सुरू केलेली ही स्पेशल ऑफर फक्त 96 तासांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी घाई करण्याची आवश्यकता आहे.

किती रुपये तिकीट –

टाटा ग्रुपच्या (Tata Group) या एअरलाईन ऑफर मध्ये तुम्हाला देशांतर्गत प्रवासासाठी वन वे इकॉनोमिक क्लास तिकीट बुक करावे लागेल. या वनवे इकॉनोमिक क्लास साठी 1470 रुपये एवढे भरावे लागतील. तर बिझनेस क्लाससाठी प्रवाशांना 10,130 रुपये भरावे लागेल. यासोबतच एयर इंडियाचे फ्लाईंग रिटर्न सदस्य देखील सर्व तिकिटांवर डबल लॉयल्टी बोनसचा फायदा घेऊ शकतात. एवढच नाही तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी देखील कंपनीने ही ऑफर लॉन्च केले आहे.

जर तुम्ही हे तिकीट ऑनलाइन पद्धतीने एअर इंडियाच्या वेबसाईटवरून किंवा मोबाईल ॲप वरून बुक केले तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचे सर्विस चार्ज भरावे लागणार नाही. जर तुम्ही रजिस्टर ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट च्या माध्यमातून तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला या ऑफरचा फायदा घेता येऊ शकतो. परंतु त्यावेळी तुम्हाला सर्विस चार्ज द्यावे लागेल.

कधीपर्यंत आहे ऑफर –

टाटा ग्रुपची एयरलाइन ऑफर 17 ऑगस्ट पासून सुरू होऊन 20 ऑगस्ट ला रात्री 11.59 वाजेपर्यंत असणार आहे. एयर इंडियाच्या या स्पेशल सेलमध्ये तुम्ही एक सप्टेंबर 2023 पासून 31 ऑक्टोंबरच्या प्रवासासाठी तिकीट बुक करू शकता.

स्पाइस जेटनेही आणली ऑफर –

दुसरीकडे देशाच्या स्वातंत्र्यदिना निमित्त स्पाईस जेटने सुद्धा प्रवाशांसाठी स्वस्तात मस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही 15 ऑगस्ट ते 30 मार्च 2024 पर्यंतच्या प्रवासासाठी टिकीट बुक करू शकता. ही ऑफर 20 ऑगस्ट पर्यतच असून स्पाइस जेट 1,515 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत तिकीट उपलब्ध करून देत आहे.