Airtel Recharge : तुम्हीही Internet चा जास्त वापर करत नाही? मग Airtel चे स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठीच

टाइम्स मराठी । Airtel आणि Jio रिलायन्स आपल्या युजरसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान घेऊन येत असतात. जिओ नंतर एअरटेल ही देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी बनली आहे. नुकतच एअरटेल कंपनीने 5g नेटवर्क सुरू केले असून आपल्या यूजर्सना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहक आपल्याकडेच खेचण्यासाठी कंपनीकडून वेगवेगळे रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge) आणि ऑफर्स दिल्या जातात. त्यानुसार कंपनीकडे बरेच कीपॅड रिचार्ज प्लान देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे युजर्सला प्रचंड फायदा होतो. असाच एक रिचार्ज प्लॅन एअरटेल तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

   

जर तुम्ही इंटरनेट डेटा कमी प्रमाणात वापरत असाल. किंवा ऑफिस आणि बाहेर इंटरनेट डेटा वापरत असाल आणि घरी WIFI चा वापर करत असाल तर तुम्ही एअरटेलचे 1 GB डेटा प्लॅन घेऊ शकतात. ज्या लोकांना जास्त इंटरनेटची गरज नसते अशा लोकांसाठी हे प्लॅन्स उपलब्ध आहे. जाणून घेऊया एअरटेलचे रिचार्ज प्लॅन.

Airtel चा 265 रुपयांचा रिचार्ज प्लॅन-

Airtel कंपनीच्या 265 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये (Airtel Recharge) दररोज 1 GB डेटा युजर्सला कंपनीकडून ऑफर केला जातो. हा प्लॅन फक्त 28 दिवसांसाठी व्हॅलिड आहे. जर यूजरचा एक जीबी डेटा संपल्यास या डेटा प्लॅनचे स्पीड हे 64 केबीपीएस एवढा होते . म्हणजेच पूर्णपणे तुमचा डेटा काम करणे सोडत नाही. या प्लॅन सोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस या ऑफर्स ग्राहकांना उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला एअरटेल थँक्सचे फायदे देखील मिळू शकतात. यासोबतच 5G नेटवर्क मध्ये देखील ही ऑफर लागू होते. एवढेच नाही तर या प्लॅन सोबत फ्री हॅलो ट्यून, विंक म्युझिक, या दोन ऑफर फ्री मध्ये मिळतात. तुम्ही एअरटेल थँक्सच्या माध्यमातून एअरटेल चा 265 रुपयांचा प्लान रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला दोन जीबी डेटाचे स्पेशल ॲप देखील मिळू शकते.

Airtel चा 239 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – Airtel Recharge

Airtel च्या या 239 रुपयांचा रिचार्ज प्लॅन मध्ये युजर्स ला 24 दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात आली आहे. या रिचार्ज प्लान मध्ये दररोज 1 GB डेटा दिला जातो. ज्या युजर्स कडे 5G नेटवर्क उपलब्ध आहे असे यूजर 5G इंटरनेटचा देखील वापर करू शकतात. एअरटेलच्या या रिचार्ज प्लान सोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस सुविधा मिळते. यासोबतच या रिचार्ज प्लॅन सोबत अतिरिक्त एअरटेल थँक्स रिवॉर्ड देखील देण्यात येऊ शकतात.

Airtel चा 201 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Airtel कंपनीच्या या 201 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge) मध्ये 21 दिवसांची व्हॅलेडीटी देण्यात आली आहे. यामध्ये एक 1 GB दररोज मिळतो. डेटा संपल्यानंतर याचे स्पीड 64 kbps एवढ राहते. हा प्लॅन देखील एअरटेल थँक्स रिवार्ड सह उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लान सोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेली 100 एसएमएस ऑफर केले जातात. यासोबतच फ्री हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिक देखील दिले जातात.