Airtel Xstream AirFiber : Airtel ने लाँच केली देशातील पहिली 5G FWA सेवा; पहा फायदे आणि प्लॅनची किंमत

टाइम्स मराठी (Airtel Xstream AirFiber)। प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी एअरटेल ने देशातील आपली पहिली 5G FWA ( म्हणजेच फिक्स्ड-वायरलेस एक्सेस) सेवा सुरु केली आहे. Airtel Xstream AirFiber असं याचे नाव असून सेवा टप्प्याटप्प्याने सर्व शहरांमध्ये सुरू करून राष्ट्रीय स्तरापर्यंत विस्तारण्याची कंपनीची योजना आहे. सुरुवातीला ही सुविधा दिल्ली आणि मुंबई शहरासाठी सुरू करण्यात आली आहे. एअरटेल एक्स्ट्रीम एअर फाइबर हे एक प्लग इन प्ले डिवाइस आहे. यामध्ये इनबिल्ड वायफाय 6 ही टेक्नॉलॉजी देण्यात आलेली असून या डिवाइसमुळे एकाच वेळी 64 डिवाइस वर इंटरनेट चालवू शकता.

   

सध्या कोणकोणत्या शहरात सुविधा सुरू? Airtel Xstream AirFiber

Airtel Xstream AirFiber हे 5G वायरलेस वाय-फाय डिवाइस आहे. देशात ज्या ठिकाणी फायबर वायफाय उपलब्ध नाही अशा ठिकाणी एअरटेल च्या माध्यमातून इंटरनेट सर्विस उपलब्ध करण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी फायबर इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं हे अत्यंत कठीण आहे अशा ठिकाणी या डिवाइसमुळे कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. हे सर्वात मोठे आव्हान आहे. याबाबत एअरटेल चे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी सांगितलं की, दिल्ली आणि मुंबई या शहरात सुरू करण्यात आलेल्या या सेवेचा फीडबॅक घेण्यात येणार आहे. त्यानुसार संपूर्ण देशात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये 5G फिक्स वायरलेस एक्सेस वाढवण्यासाठी सर्वात मोठे आव्हान हे CPE, (ग्राहक परिसर उपकरण) आहे.

एकावेळी 64 डिवाइस करू शकता कनेक्ट –

Airtel Xstream AirFiber हे ब्लॉग अँड प्ले डिवाइस असून त्याला वायफाय 6 ही टेक्नॉलॉजी सपोर्ट करते. यामुळे युजर्स ला इन डूअर कव्हरेज दिले जाते. जाते. Xstream AirFiber सह तुम्हाला एक FWA डिव्हाईस देखील देण्यात येणार आहे. या डिव्हाईस मुळे तुम्ही कधीही आणि कोणत्याही ठिकाणी इंटरनेट कनेक्ट करू शकतात. आणि या डिवाइस सोबत 64 डिवाइस देखील कनेक्ट केले जाऊ शकतात.

किंमत किती ?

Airtel Xstream AirFiber ही वायरलेस होम वाय-फाय सर्विस 799 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. हे 100 mbps पर्यंत स्पीड देते. हा प्लॅन तुम्ही सहा महिन्यांसाठी 2500 रुपयांच्या वन टाइम रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट सह 4,435 रुपयांमध्ये देखील खरेदी करू शकतात. तुम्हाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एअरटेल स्टोअरवर जाऊ शकता.