Ajio ने लॉन्च केले नवीन ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Ajiogram; फॅशन क्षेत्रात क्रांती घडणार

टाइम्स मराठी । फॅशन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Ajio ने एक D2C फोकस कन्टेन्ट इंटरॅक्टिव्ह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. या प्लॅटफॉर्म चे नाव Ajiogram ठेवण्यात आले असून 2 नोव्हेंबरला हे प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आले. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फॅशन स्टार्टअप्सला सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्मचा फोकस खास करून डायरेक्ट टू कंजूमर D2C वर असेल.

   

Ajio या नवीन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय फॅशन इंडस्ट्रीमध्ये काही नवीन करण्याचा विचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या नावीन्यतेला चालना देण्यासाठी मदत होईल. Ajiogram या प्लॅटफॉर्मला Ajio आजच्या मदतीने एक्सेस करण्यात येऊ शकतो. या कंपनीचे खास लक्ष हे पुढील वर्षापर्यंत प्लॅटफॉर्मवर 200 पेक्षा जास्त D2C फॅशन ब्रँड जोडणे हे आहे. हे लक्ष ग्राहकांना स्टीट वेअर पासून ते फास्ट, कारागीर, क्वाईड लक्झरी, मिनीमिलिस्टिक, यासारखे बरेच ऑप्शन उपलब्ध करेल.

Ajiogram हे प्लॅटफॉर्म ज्या ब्रँड्सला एक्सक्लुझिव्ह पद्धतीने लॉन्च करेल यामध्ये अर्बन मंकी, सुपरवेक, क्विक स्मिथ, KRA लाईफ, क्रियेचर्स ऑफ हॅबिट, सेसिल, टूसर, फॅन्सी पॅन्ट्स , मीड नाईट एंजल बाय पीसी, माँक्स ऑफ मेथड, क्राफ्ट अँड ग्लोरी यांचा समावेश असेल. Ajiogram या प्लॅटफॉर्मवर या ब्रँड्सला एकत्रित करण्यात येणार आहे. आणि हे ब्रँड्स पुढे जाण्यासाठी त्यांच्या नावीन्यतेला मदत केली जाणार आहे. जेणेकरून त्यांची ग्रोथ वाढेल. भारतातील पुढच्या 100 फॅशन स्टार्टअप्सला मजबूत बनवणे. हे या कंपनीचे लक्ष आहेत.

काय म्हणाले Ajio चे CEO विनोद नायर

Ajio चे सीईओ विनोद नायर यांनी सांगितलं की, ‘नवीन जनरेशनच्या ग्राहकांना सध्या एकाच ब्रांडचे प्रोडक्ट हवे आहेत. याच उद्देशाने ब्रँड शोधत आहोत. काही वर्षापासून देशातील डिरेक्ट टू कंजूमर  D2C या सेगमेंट मध्ये  एक प्रकारची क्रांती दिसून आली आहे. ज्यामुळे इनोव्होटिव्ह आणि फॅशन मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ब्रँड्सला जन्म दिला आहे.’