AJIO Sale : आजपर्यंतचा सर्वात मोठा सेल 1 जूनपासून होतोय सुरु! Iphone, Macbook जिंकण्याची संधी, चेक करा डिटेल्स…

मराठी टाइम्स टीम । भारतातील प्रिमियम फॅशन ई-रिटेलर AJIO येत्या 1 जुन पासून आपल्या सर्वांसाठी बिग बोल्ड सेल (AJIO Sale) सुरू करणार आहे. यामध्ये ग्राहकांना एकाचवेळी वेगवेगळ्या ब्रॅंड्सची अतिशय कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. बिग बोल्ड सेल असे या सेलचे नाव असून येत्या ग्राहकांचा याला तुफान प्रतिसाद मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

   

मित्रांनो, या सेलची सुरवात 1 जून पासून होणार असली तरीही 28 मे पासूनच ग्राहकाना 6 तासासाठी एक्सेस देण्यात आलेला आहे. हा आता पर्यंत चा सर्वात मोठा बिग बोल्ड सेल आहे. विशेष बाब म्हणजे या सेल मध्ये 1.30 कोटींपेक्षा जास्त फॅशन वस्तू ग्राहक निवडू शकतील. तसेच तब्बल 5000 हुन अधिक ब्रँड या सेलमध्ये सहभागी होणार आहेत. देशभरातून 19 हजारापेक्षा जास्त नागरिक या सेलमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याचबरोबर या सेलमध्ये 1 लाखापर्यंत सोने, ऍपल मॅकबुक जिंकण्याची सुवर्ण संधी देखील मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय ब्रँड, खाजगी लेबल आणि स्थानिक कंपन्यांमधून खरेदी करण्याची खास संधी या बिग बोल्ड सेल मध्ये मिळणार आहे. ग्राहकांना फॅशन, जीवनशैली, गृहसजावट, सौंदर्य उत्पादने, दागिने आणि वैयक्तिक काळजी संबंधित सामान घेण्यासाठी हे ब्रँड उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना बेस्ट डील देखील मिळेल. या सेल मध्ये ग्राहकांचा विचार करून त्यांना वस्तूंवर 50 ते 90 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. एवढंच नाही तर SBI क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यावर त्यांना अतिरिक्त 10 टक्के सूट देखील मिळू शकते.

या ब्रँड च्या वस्तू करु शकतात खरेदी

बिग बोल्ड सेल मध्ये 5 हजार पेक्षा जास्त ब्रँड सहभागी झालेले आहे. त्यामधे एडिडास, नाइकी, पूमा, सुपरड्राई, गैप (GAP), यूएसपीए (USPA), स्टीव मैडन, लीवाइस, मार्क्स एंड स्पैन्सर, अरमानी एक्सचेंज, रितु कुमार, मुजी, बुडा जीन्स, फायर रोज़, एनक्रस्टेड, पोर्टिको, होम सेंटर, कैसियो, लैकमे, मैबलिन और मेलोरा या व्यतिरिक्त अन्य ब्रँडच्या वस्तू तूम्ही खरेदी करु शकतात.

60 दशलक्ष नवीन वापरकर्ते अपेक्षित

या सेलबाबत, बिग बोल्ड सेल हा भारताचा आवडता फॅशन फेअर बनला आहे. आमच्या ग्राहकांकडून आम्हाला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. यावेळी ही विक्री आतापर्यंतची सर्वात मोठी आहे, आम्ही 60 दशलक्ष नवीन वापरकर्ते फॅशनच्या आंतरराष्ट्रीय, स्थानिक आणि खाजगी ब्रँडच्या विक्रीत सहभागी होण्यासाठी AJIO ला भेट देण्याची अपेक्षा करत आहोत. असं AJIO चे सीईओ विनीत नायर म्हणाले.

Fashion’s Most Wanted

या बीग बोल्ड सेल संदर्भात एक मोहीम देखिल सुरु करण्यात येणार आहे. Fashion most wanted हे या चित्रपट मोहीमेचं नाव असणार आहे. यामध्ये आपल्या चाहत्यां पासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे वारंवार बदलताना बॉलीवूड अभिनेत्री दिसणार आहे. आणि या साठी मदत करताना बॉलीवूड अभिनेता दिसणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या चित्रपट मोहिमेत कोणती बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेता हे पात्र साकारतील, तर श्रद्धा कपूर आणि राणा दगुबत्ती या चित्रपट मोहिमेत दिसतील. हा चित्रपट 31 मे म्हणजेच बुधवारी लॉन्च करण्यात येणार आहे. हा एक ॲक्शन पॅक कॅम्पेन फिल्म असणार आहे.

या सेल मध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दररोज सुपर अवर्स असणार आहे. ज्यामधून जास्तीत जास्त डील चा लाभ ग्राहक घेऊ शकणार आहे. यामध्ये काही खरेदी दारांना आयफोन 14 प्रो, ऍपल मॅकबुक एअर मिळणार आहे. तसेच 1 लाख रुपयांपर्यंत सोने जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. या सेल मध्ये विक्रीतील टॉप 3 खरेदीदाराला 3 लाख रुपयांपर्यंत सोने जिंकण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नाही तर 4 हजार 999 किंवा त्या पेक्षा जास्त 9 हजार 999 किमतीच्या खात्रीशीर भेटवस्तू देखील मिळू शकतात. आणि प्रीपेड व्यवहारावर अतिरिक्त दहा टक्के सूट देखील मिळणार आहे.