जगातील पहिली हवेत उडणारी Electic Car; 12,308 रुपयांत करा बुकिंग

टाईम्स मराठी । कॅलिफोर्निया येथील सस्टेनेबल इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन कंपनी एलेफ एरोनॉटिक्स या कंपनीने इलेक्ट्रिक फ्लाईंग कार चा पहिला लूक जगासमोर आणलेला आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार 2025 पर्यंत ही कार बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकन सरकारने मंजुरी दिली आहे. अवघ्या 12,500 रुपयांत तुम्हाला प्री बुकिंग करता येणार आहे. ही कार 2015 मध्येच बनून तयार होती. या कंपनीचा उद्देश पहिली उडणारी कार बनवण्याचा होता.

   

रेंज किती देते?

एलेफ एरोनॉटिक्स या कारला सार्वजनिक रस्त्यावर देखील चालवली जाऊ शकते. या कारमध्ये टेकऑफ आणि लँडिंग क्षमता आहे. या कारच्या लूक बद्दल बोलायचे झाले तर एलेफ एरोनॉटिक्स फ्लाईंग कारचा फ्युचरिस्टिक फ्लोई शेप असून ती कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या डिझाईन सोबत येत नाही. या कारचा ढाचा रेगुलर कार सारखाच आहे. या कारच्या बॉडी मध्ये 8 प्रोफेलर लावण्यात आलेले आहे. एलेफ एरोनॉटिक्स ही फ्लाईंग कार 200 मैल म्हणजे 322 किलोमीटर ड्रायविंग रेंज आणि 110 मैल म्हणजे 177 किलोमीटर हवेत फ्लाईंग रेंज देते.

किंमत किती?

या फ्लाईंग कार ची किंमत 300,000 अमेरिकी डॉलर म्हणजेच 2.46 करोड रुपये एवढी असू शकते. या इलेक्ट्रिक मॉडेल ला एलेफ च्या वेबसाईटच्या माध्यमातून प्री बुकिंग करण्यासाठी 150 अमेरीकी डॉलर म्हणजेच 12,308 रुपयाचे टोकन किंमत असू शकते. त्याचबरोबर फर्स्ट बुकिंग करण्यासाठी 1500 अमेरिकी डॉलर म्हणजे 1.23 लाख रुपये स्वीकारले जात आहे.

एका निवेदनात एलेफने सांगितले की, युएस फेडरेल एव्हीएशन ऍडमिनिस्ट्रेशन यांच्याकडून विशेष हवाई पात्रता प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. अशा स्वरूपाच्या वाहनाला यूएस सरकारकडून उड्डाण करण्यासाठी कायदेशीर मान्यता पहिल्यांदा मिळाल्याचं यात सांगण्यात आलं. त्याचबरोबर ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर साठी देखील निर्देश देण्यात आले आहे.